शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

अहवालाअंती कोचिंग क्लासेसवर कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:23 IST

एज्युकेशन हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती शहरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. खासगी कोचिंग क्लासच्या नोंदणीत हयगय व सुरक्षिततेच्या मानकांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. या विषयात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी सोमवारी दिले. आयुक्तांनी सोमवारी सकाळी या विषयाच्या अनुषंगाने बैठक घेतली व समिती सदस्यांना पुन्हा सूचना देऊन तत्काळ अहवाल मागितला आहे.

ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांची तंबी : सुरक्षेत हयगय खपविणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एज्युकेशन हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती शहरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. खासगी कोचिंग क्लासच्या नोंदणीत हयगय व सुरक्षिततेच्या मानकांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. या विषयात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी सोमवारी दिले.आयुक्तांनी सोमवारी सकाळी या विषयाच्या अनुषंगाने बैठक घेतली व समिती सदस्यांना पुन्हा सूचना देऊन तत्काळ अहवाल मागितला आहे.गुजरात राज्यातील सरथाना येथील चार मजली इमारतीला लागलेल्या आगीत २१ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अमरावती शहरात सुरू असलेल्या खासगी शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या, हा प्रश्न प्रामुख्याने समोर आला. शहरात दीडशेवर खासगी कोचिंग क्लासेस आहेत. लाखो रुपये शुल्क आकारणी केली जाते. तथापि, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून कुठल्याही उपाययोजना नाहीत. आयुक्तांनी हा विषय गांभीर्याने घेतला व शहरातील सर्व खासगी शिकवणी वर्गांच्या तपासणीचे आदेश २६ मे रोजी दिले होते. या आदेशाच्या अनुषंगाने सहआयुक्त (मुख्यालय), सहायक आयुक्त (बाजार व परवाना), नगर रचनाकार, शिक्षणाधिकारी, अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख, अग्निशमन अधीक्षक या सहा समिती सदस्यांना शिकवणी वर्गात नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचेच निदर्शनात आले. महापालिकेच्या बाजार व परवाना विभागात फक्त १७ क्लास नोंदविल्याचे आढळून आले. महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक आणि जीवन सुरक्षा उपाययोजना अधिनियम २००६ च्या अनुषंगानेही उपाययोजना या ठिकाणी नसल्याचे समिती सदस्यांच्या निदर्शनात आले. त्यामुळे कोचिंग क्लासेसना नोटीस बजावण्यात आल्यात.खासगी शिकवणी अधिनियम केव्हा?खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र खासगी शिकवणी (विनियमन) अधिनियम २०१८ चा मसुदा मागील वर्षी तयार करण्यात आला. सुरत येथील दुर्घटनेच्या अनुषंगाने आगामी अधिवेशनात हा मसुदा आल्यास याचे कायद्यात रूपांतर होऊ शकते. शिक्षण आयुक्तांच्या १२ सदस्यीय समितीने हा मसुदा तयार केला आहे. यामध्ये विद्यार्थिसंख्या, शुल्काची आकारणी, अग्निरोधक यंत्रणा यांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक बाबींचा समावेश आहे. अनेक राज्यांमध्ये याविषयीचे कायदे असताना, महाराष्ट्रात याविषयीचा अधिनियम केव्हा, असा पालकांचा सवाल आहे.या बाबींना आवर हवाखासगी शिकवणी वर्गाची महापालिकेच्या बाजार व परवाना विभाग किंवा अन्य कुठल्याच यंत्रणेकडे नोंदणी नाही. या क्लासेसमध्ये मनमानी शुल्क आकारणी केली जाते. हे शिकवणी वर्ग कुठल्याही जागेत घेतल्या जातात. विद्यार्थिसंख्येला आवर नसल्याने ते कोंडवाडे झाले आहेत. पार्किंग सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही त्रास होतो. येण्या-जाण्याचे दोन मार्ग नाहीत; एकमेव मार्गदेखील प्रशस्त नाही. आपत्कालीन स्थितीत अग्निरोधक यंत्रणा किंवा इतर सुरक्षाविषयक निकषांचा अभाव आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने फायर आॅडिट झालेले नाही.शहरातील खासगी कोचिंग क्लासेसच्या बेपर्वा धोरणाला पायबंद घालण्यासाठी समिती पाहणी करीत आहे. एक- दोन दिवसांत अहवाल मिळताच या नियमबाह्य वर्गांवर कठोर कारवाई केली जाईल.- संजय निपाणे, आयुक्त, महापालिका