बांधकाम विभागात सेनेचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:37 IST2017-12-14T00:36:50+5:302017-12-14T00:37:05+5:30
बियाणी चौक ते विद्यापीठाकडे जाणाºया मार्गाचे काम सा.बां. विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. सदर कामे संथ गतीने होत असून दोन्ही बाजूने एकाच वेळी कामे केली जात असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

बांधकाम विभागात सेनेचा ठिय्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बियाणी चौक ते विद्यापीठाकडे जाणाºया मार्गाचे काम सा.बां. विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. सदर कामे संथ गतीने होत असून दोन्ही बाजूने एकाच वेळी कामे केली जात असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पंकज कॉलीनजीक दुभाजकांवर पथदिवे लावावे आदी मागणीसंदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
पंकज कॉलनीनजीक दुभाजकांमुळे या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. रात्री सदर दुभाजक दिसतच नाही. त्यामुळे रस्याचे कामे करताना या ठिकाणी पथदिवे लावणे गरजेचे आहे. विद्यापीठात विद्यार्थ्यांची ये-जा असते. त्यामुळे हा महत्त्वाचा रस्ता असल्याने या ठिकाणी एकाच वेळीस रस्त्याच्या कामांना सुरूवात केल्याने ये-जा करणाºयांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख अमोल निस्ताने यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंत्याच्या दालनात ठिय्या देण्यात आला. कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे काही कामानिमित्त बाहेर असल्याने उपअभियंता आशुतोष शिरभाते यांना निवेदन देण्यात आले. समस्या त्वरित निकाली काढावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शोटू इंगोले, दीपक काळे, संजय बुंदिले, उमेश गोेगटे, मोहन क्षीरसागर, संजय देशमुख, पिंटू चावरे, राहुल अंभोरे यांच्यासह २० ते २५ शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
बियाणी, विद्यापीठ, मार्डी रस्त्याचे कामे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून याकडे अभियंत्यांचे मुळीच लक्ष नाही.वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे, अन्यथा आंदोलन तीव्र करू.
- अमोल निस्ताने,
उपशहरप्रमुख, शिवसेना