फे्रजरपुऱ्यात दोन गटांत तणाव

By Admin | Updated: July 23, 2015 00:15 IST2015-07-23T00:15:33+5:302015-07-23T00:15:33+5:30

फे्रजरपुरा परिसरातील एका मंदिर परिसरात शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोन गटामध्ये मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास तणाव निर्माण झाला होता.

Stress in two groups in Farraghar | फे्रजरपुऱ्यात दोन गटांत तणाव

फे्रजरपुऱ्यात दोन गटांत तणाव

पाच जणांना अटक : मंदिर परिसरात शिवीगाळ केल्याने घडली घटना
अमरावती : फे्रजरपुरा परिसरातील एका मंदिर परिसरात शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोन गटामध्ये मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन घटनास्थळावरील तणाव नियंत्रणात आणला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील पाच जणांना अटक केली आहे.
भगतसिंग चौकातील एका मंदिरात रहिम नावाच्या युवकाने अश्लिल शिवीगाळ केली. त्यामुळे महिलेने रहिम विरोधात सोमवारी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ५०६ व २९४ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रहिम हा जामिनवर बाहेर आला होता. रहिमच्या समर्थक काही महिलांंनी फे्रजरपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रारकर्ता महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली होती. हा सर्व प्रकार घडल्यावर मंदिर परिसरातच दोन गटात शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देणे सुरु झाले. दोन्ही गट आमनेसामने आल्याने काही तासापुरता तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती फे्रजरपुरा पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सी.एस.खंडेराव यांच्या मार्गदर्शनात एपीआय जितेंद्र ठाकूर, सिरसाठ, पीएसआय लभाने यांचे पथक घटनास्थळी पोहचले. काही वेळात पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनीही घटनास्थळी जावून पाहणी केली. पोलिसांचा ताफा तैनात झाल्यावर काही वेळात तणावाची स्थिती नियंत्रणात आली. मंदिर परिसरातील लायब्ररी चौक व काही ठिकाणी क्युआरटी पथक, कमांडो पथक, आरसीपी व अतिरीक्त पोलीस बदोबंस्त लावण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)

पाच आरोपींना अटक
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तणावाची स्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर पहाटे ४ वाजताच्या सुमारास दोन्ही गटातील पाच आरोपींना अटक केली.
एका गटातील सुजीत गिरधारी तायडे (३९, रा. फे्रजरपुरा), निरंजन मोहन दुबे (२७,रा. बालाजी प्लॉट), शैलेश विनोद बन्ने (२५, रा. फे्रजरुपुरा) व दुसऱ्या गटातील शेख समिर शेख जिलानी (२५) व नाझिम अब्दुल रज्जाक (रा.दोन्ही राहणार फे्रजरपुरा) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत

नगरसेवक जयस्वाल यांच्यावर गुन्हा दाखल
मंगळवारी परवीन बानो राजेश श्रीवास (३२,रा. भगतसिंग चौक) ही महिला शेख रहिम व विनोद बन्ने यांच्याविरोधात तक्रार केल्याची माहिती देण्यासाठी नगरसेवक अरुण जैयस्वाल यांच्याकडे गेली. दरम्यान अरुण जैयस्वाल यांनी परविन बानो यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली, असा आरोप परवीन बानो यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्यानुसार पोलिसांनी अरुण जैयस्वाल, नितीन गोदे , संजू तायडे व संदेश बन्ने यांच्याविरूध्द भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Stress in two groups in Farraghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.