दमदार पाऊस : जिल्ह्यातील पाचही धरणाचे दरवाजे उघडले

By Admin | Updated: August 13, 2015 00:53 IST2015-08-13T00:53:33+5:302015-08-13T00:53:33+5:30

जिल्ह्यात ४ आॅगस्टपासून सतत पाऊस सुरू असल्याने सर्व धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे.

Strenuous rain: The doors of the five dams opened in the district | दमदार पाऊस : जिल्ह्यातील पाचही धरणाचे दरवाजे उघडले

दमदार पाऊस : जिल्ह्यातील पाचही धरणाचे दरवाजे उघडले

अमरावती : जिल्ह्यात ४ आॅगस्टपासून सतत पाऊस सुरू असल्याने सर्व धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे एक मुख्य व चार मध्यम प्रकल्पांची दरवाजे मंगळवारी सायंकाळनंतर उघडण्यात आले आहे. नदी-नाले ओंथबून वाहत असल्याने नदी नाल्याकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात मंगळवारी सर्वच तालुक्यांत पाऊस पडला. २७.२ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली. १० दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात सार्वत्रिक पाऊस असल्यामुळे पाचही धरणांच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मंगळवार ते बुधवारी सकाळपर्यंत २४ तासात सर्वाधिक ६६ मि.मी. पाऊस तिवसा तालुक्यात पडला आहे.

Web Title: Strenuous rain: The doors of the five dams opened in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.