धामणगावात मुख्याध्यापक संघाचे बळकटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:16 IST2021-09-07T04:16:37+5:302021-09-07T04:16:37+5:30

फोटो - सिंगल दोन. धामणगाव व धामणगाव १ या नावाने. पी ०६ वर धामणगाव रेल्वे : तालुक्यातील माध्यमिक शाळांना ...

Strengthening the headmaster's team in Dhamangaon | धामणगावात मुख्याध्यापक संघाचे बळकटीकरण

धामणगावात मुख्याध्यापक संघाचे बळकटीकरण

फोटो - सिंगल दोन. धामणगाव व धामणगाव १ या नावाने. पी ०६ वर

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील माध्यमिक शाळांना सर्व उपयुक्त माहिती वेळेवर पोहोचावी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत अधिक वाढ व्हावी तसेच समन्वय राहावा याकरिता माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांची कार्यकारणी नुकतीच घोषित करण्यात आली. अध्यक्षपदी मिलिंद देशमुख, तर सचिवपदी भाऊराव गाढवे यांची निवड करण्यात आली.

तालुक्यात २५ हून अधिक माध्यमिक शाळा आहेत. ग्रामीण व शहरी भागातील शेकडो विद्यार्थी यात ज्ञानार्जन करतात. दिवसेंदिवस बदलत्या काळात मंत्रालयापासून तर थेट ग्रामीण भागापर्यंत एकाच क्लिकवर माहिती उपलब्ध करण्यात येते. ती माहिती वेळेवर भरता यावी तसेच विद्यार्थ्यांची अधिक प्रगती व्हावी, याकरिता तालुक्यातील माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांची तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी गणेश चांडक, उपाध्यक्ष अर्चना राऊत, सहसचिव विजय गुल्हाने, वासुदेव पाटील, कोषाध्यक्ष सुनीता देशपांडे, महिला प्रतिनिधी मंजूषा देशमुख, अरुणा थोटे, सदस्य रामेश्वर नागपुरे, सुधाकर मसराम, प्रमोद हटवार, तालुका प्रतिनिधी भाऊराव गाढवे यांची नियुक्ती करण्यात आली.

Web Title: Strengthening the headmaster's team in Dhamangaon