अर्धा डझन गावांतील पथदिवे दिवसभर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:12 IST2021-01-22T04:12:34+5:302021-01-22T04:12:34+5:30
ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष : ग्रामसेवक बेपत्ता चुरणी : चिखलदरा तालुक्यातील सोमवारखेडा, मलकापूर, बागलिंगा, वस्तापूर, बदनापूर, कालापाणी, हिरदामल या गावातील ...

अर्धा डझन गावांतील पथदिवे दिवसभर सुरू
ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष : ग्रामसेवक बेपत्ता
चुरणी : चिखलदरा तालुक्यातील सोमवारखेडा, मलकापूर, बागलिंगा, वस्तापूर, बदनापूर, कालापाणी, हिरदामल या गावातील ग्रामसचिव व सरपंचाच्या दुर्लक्षामुळे गावातील पथदिवे दिवसभर सुरू राहत आहे. ते वीजबिल ग्रामपंचायत भरत असले, तरी कराच्या रकमेतून ते अदा होत असल्याने दिवसाच्या वीजपुरवठ्याचा भुर्दंड आम्ही का सहन करायचा, असा सवाल या ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
चिखलदरा तालुक्यातील एखादी ग्रामपंचायत वगळता सर्वच ग्रामपंचायतींचे ग्रामसचिव हे त्या गावातील मुख्यालयाला हजर राहत नाहीत. ते शहराच्या वा तालुका मुख्यालयाच्या ठिकाणाहून आठवड्यातून एखाद-दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयाकडे फिरकतात. त्याचा फटका ग्रामस्थांना बसतो. तालुक्यातील अनेक गावांतील पथदिवे दिवसभर सुरू राहत असल्याचे दृष्टीस पडतात. सर्व ग्रामस्थांना ते दिसतात, तर ग्रामसेवक, सरपंच, पदाधिकाऱ्यांना ते का दिसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
--------------