विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या सडक सख्याहरींना बदडले
By Admin | Updated: September 29, 2014 00:32 IST2014-09-29T00:32:32+5:302014-09-29T00:32:32+5:30
शिकवणी वर्गाला जाणाऱ्या तीन विद्यार्थिनींचा दुचाकीने पाठलाग करून त्यांची छेड काढणाऱ्या दोन सडक सख्याहरींना लोकांनी बेदम चोप दिला. परंतु दुचाकी रस्त्यावर टाकून पळून जाण्यात

विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या सडक सख्याहरींना बदडले
अचलपूर : शिकवणी वर्गाला जाणाऱ्या तीन विद्यार्थिनींचा दुचाकीने पाठलाग करून त्यांची छेड काढणाऱ्या दोन सडक सख्याहरींना लोकांनी बेदम चोप दिला. परंतु दुचाकी रस्त्यावर टाकून पळून जाण्यात दोन्ही मजनू यशस्वी झाले. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
येथील एका शाळेतील इयत्ता १२ वीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनी दुचाकीवरून रात्री साडेसात ते साडेआठ वाजेपर्यंत खासगी शिकवणी वर्गाला जातात. मोपेडने सरमसपुऱ्याकडे जाताना काही दिवसांपासून दोन तरूण त्यांचा सतत पाठलाग करीत होते. विद्यार्थिनींना बघून हातवारे करणे, अश्लील शेरेबाजी करणे, मोबाईलवर जोरजोराने गाणी वाजविणे आदी प्रकार सुरू होते.
मुलींनी ही बाब पालकांना सांगितली. शनिवारी परिसरातील नागरिकांनी सरमसपुुऱ्यात या तरूणांना पकडून बेदम मारहाण केली. परंतु गर्दीचा फायदा घेऊन ते पळून जाण्यात यशस्वी झाले.