समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक वाटचाल आवश्यक

By Admin | Updated: August 12, 2015 00:16 IST2015-08-12T00:16:59+5:302015-08-12T00:16:59+5:30

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पुढील धोरणात्मक वाटचाल करण्याचे आवाहन आदिवासी विकास ...

Strategic approach to the overall development of society is essential | समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक वाटचाल आवश्यक

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक वाटचाल आवश्यक

मधुकर पिचड यांचे प्रतिपादन : जागतिक आदिवासी अस्मिता दिन
अमरावती : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पुढील धोरणात्मक वाटचाल करण्याचे आवाहन आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकर पिचड यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
समाजातील शिक्षणाचे प्रमाण गुणवत्तापूर्वक वाढविण्याकरिता व आदिवासींनी आपली आर्थिक प्रगती साधण्यासाठी शेतीपूरक व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे मार्गदर्शन माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी यावेळी केले. आदिवासींच्या आरक्षणात अन्य समाजघटकातील लोकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असून त्याला माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी कडाडून विरोध दर्शविला. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे सचिव दशरथ मडावी यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व आणि उद्देश उपस्थितांना पटवून दिले. यावेळी मतीन भोसले यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मधुकर भादीकर, संचालन हिंमत उइके, तर आभार प्रदर्शन स्वागताध्यक्ष राम चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमाला माजी महापौर वंदना कंगाले, राजू मसराम, दिव्या सिसोदे, महानंदा टेकाम, रामेश्वर युवनाते संपूर्ण विदर्भातील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुखदेव सोळंके, किरण कुमरे, अजाबराव उइके, ज्ञानेश्वर सोळंके, वसंतराव सोनोने, मनीष भोसले, सहदेव पवार, सागर चव्हाण, प्रभूदास चव्हाण, नंदू मरस्कोल्हे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Strategic approach to the overall development of society is essential

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.