शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

ऐकावे ते नवलच! म्हशींनी वाचविले मालकाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 10:03 IST

अस्वलाने पशुपालकावर हल्ला चढविताच चरत असलेल्या म्हशींनी एकत्र येऊन परतीचा हमला केला व पशुपालकाचा जीव वाचविला.

ठळक मुद्देपरतवाडा तालुक्यातील कुकरू येथील घटनाअस्वलाच्या हल्ल्यात पशुपालक गंभीर

आॅनलाईन लोकमतअमरावती : आजपर्यंत पाळीव कुत्र्याने वा मांजरीने मालकाचे प्राण वाचविल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या वा वाचल्या असतील. या मुक्या जनावरांना माणसाप्रमाणेच भावना असतात याचाही आपण अनुभव घेतला असतो. म्हणूनच म्हणतात ना माणसापेक्षा मुके प्राणी बरे, त्याचा काहीसा प्रत्यय रविवारी सकाळी ८ वाजता मेळघाटच्या जंगलात आला. परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.मेळघाटलगतचा पशुपालक ठाक्या गायन (४० रा.कुकरू मध्यप्रदेश) हा आपल्या १५ ते २० म्हशी चराईसाठी रविवारी सकाळी सात वाजता जंगलात घेऊन गेला. म्हशी चरत असताना ठाक्या गायनवर अस्वलाने हल्ला केला. अस्वलाने ठाक्याचे पोट पकडून डोक्याला चावा घेतला. त्यामुळे ठाक्या जोर-जोराने ओरडू लागला. त्याच्या आवाजाने म्हशी सैरावैरा पळू लागल्या. गावशिवारातील जंगलात सदर प्रकार घडल्याने ग्रामस्थांना समजताच धाव घेऊन अस्वलीला पळवून लावले. अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी ठाक्याला भाऊ पंढरी गायन यांनी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. घंटाग ते काटकुंभ रस्त्यावर कुकरू हे मध्यप्रदेशातील गाव आहे. रविवरच्या या घटनेने परिसरात अस्वलाची दहशत पसरली आहे.

टॅग्स :Accidentअपघात