वादळी वाºयाने जमीनदोस्त झालेल्या पºहाटीची बोंडे सडू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 22:23 IST2017-10-12T22:23:37+5:302017-10-12T22:23:52+5:30
अचानक झालेल्या वादळी वाºयासह पावसाने मौजा पोही येथील कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यात कपाशी पूर्णत: जमीनदोस्त झाल्याने बोंड जमिनीला टेकले.

वादळी वाºयाने जमीनदोस्त झालेल्या पºहाटीची बोंडे सडू लागली
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदी बु. : अचानक झालेल्या वादळी वाºयासह पावसाने मौजा पोही येथील कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यात कपाशी पूर्णत: जमीनदोस्त झाल्याने बोंड जमिनीला टेकले. अशातच दमदार पावसामुळे ते बोंड काळे पडून सडू लागले आहेत. यामुळे येथील शेतकºयांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे मौजा पोही येथील नुकसानग्रस्त कपाशी पिकाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.
२९ सप्टेंबर रोजी झालेल्या वादळी वाºयासह पावसाने मौजा पोहीतील कपाशी पीक जमीनदोस्त झाले. त्यामुळे कपाशीला असलेले बोंड जमिनीला टेकले. अशात गुरुवारी बरसलेल्या धो-धो पावसाने त्यात आणखी भर पडली आहे. शेतकरी सागर विनायक इंगळे यांच्या पाच एकर शेतातील कपाशीच्या प्रत्येक झाडावरील १० ते १२ बोंड काये पडून सडत आहे. यामुळे या शेतकºयाला अंदाजे १० क्विंटल कापसाचे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे. एवढेच नव्हे, तर पºहाट्याच्या फांद्याही वाळताना दिसत आहेत. अशात हाती येणारे पिकाचे मोठे नुकसान होत असल्याचे पाहून शेतकरी सागर इंगळे विवंचनेत सापडले आहे. मौजा पोही येथील कपाशी पिकाच्या नुकसानग्रस्त शेतकरी वर्षा दिनकर बदरके, प्राची जीवन वढाळे, दुर्योधन बदरके, मुकुंद अळसपुरे, विनोद बदरके, गजानन वाडोकर, बाळू बदरके यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.