वादळाने घराचे नुकसान, मुस्लिम कुटुंबाने दिला आश्रय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:09 IST2021-06-11T04:09:36+5:302021-06-11T04:09:36+5:30
परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे रामापूर बु. येथील वाॅर्ड ३ मधील नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे ...

वादळाने घराचे नुकसान, मुस्लिम कुटुंबाने दिला आश्रय
परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे रामापूर बु. येथील वाॅर्ड ३ मधील नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. धान्य, अंथरूण, टीव्हीसारख्या उपकरणांची नुकसान झाले. त्यातच इंदिरानगरात राहणाऱ्या इंगळे यांच्या घरावरील टिनपत्रे वादळाने उडाले व विखुरले. घरात पाणी शिरल्याने रात्र कुठे काढावी, असा प्रश्न निर्माण झाला. दोन चिमुकले, म्हातारी आई, पत्नी यांना घेऊन पावसाच्या पाण्यात रात्र काढावी कशी, असा प्रश्न उपस्थित होत असताना शेजारी राहणारे मुस्लिम कुटुंब मदतीला धावले. समदखाँ, पत्नी वहिदाबी यांनी इंगळे कुटुंबाला दोन दिवसांपासून आपल्या घरात आश्रय देऊन त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. तलाठी बजरंग देवकाते यांनी घटनास्थळाला भेट देऊन नुकसानाचा अहवाल तहसीलदारांकडे पाठविला. मात्र, त्यांना अजूनपर्यंत सानूग्रह निधी मिळाला नाही.