वीटभट्टीधारकांकडून अवैध भूखंड विक्री तत्काळ थांबवा

By Admin | Updated: May 15, 2015 00:10 IST2015-05-15T00:10:05+5:302015-05-15T00:10:05+5:30

बिच्छू टेकडी, गजानननगर भागातील वीटभट्टीधारकांना लिजवर नझूलची जागा लिजवर दिलेली आहे.

Stop sale of illegal plots immediately from the vatbhabhite holders | वीटभट्टीधारकांकडून अवैध भूखंड विक्री तत्काळ थांबवा

वीटभट्टीधारकांकडून अवैध भूखंड विक्री तत्काळ थांबवा

अमरावती : बिच्छू टेकडी, गजानननगर भागातील वीटभट्टीधारकांना लिजवर नझूलची जागा लिजवर दिलेली आहे. या जागेची संबंधितांकडून अवैध विक्री केली जात आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी आ. सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
महापालिका हद्दीतील बिच्छू टेकडी, गजानननगर भागातील वीटभट्टीधारकांना कारखान्यासाठी नझूलच्या जागा ३० वर्षांकरिता लिजवर होत्या. परंतु लीज संपल्यावर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने अंदाजे १५ वर्षांपूर्वीपासून वीटभट्टी कारखान्याला परवानगी देणे बंद केले आले आहे. यासोबतच वीट कारखाने शहराबाहेर लावण्याची सूचनाही दिली आहे. तरीदेखील सदर कारखाने शहराबाहेर लावण्यात आले नाही. उलट लीज पट्ट्यावर दिलेल्या जागा परपस्पर विकण्यात आल्या आहेत. या व्यवहारात गोरगरिबांची आर्थिक फसवणूक झाली. याबाबत तक्रारी करण्यात आल्या. मात्र दखल घेण्यात आली नाही. गजानननगरात असलेल्या वीटभट्टीची जागा संबंधित मालकाने विकून आर्थिक फसवणूक केल्यामुळे या जागांबाबतची चौकशी करून कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. याप्रकरणी आ. सुनील देशमुख यांनीही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी मीना नितनवरे, रेखा इंगळे, नजमा परविन, शाहीन परविन, शालु गवई,चंदा पहाडन, प्रेमीला पहाडन, सारिका मानकर, आशा डोंगरे, वर्षा मानकर, भागर्ती बागडे, अंजना वानखडे, विजया बागडेल पायल मानकर व अन्य महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Stop sale of illegal plots immediately from the vatbhabhite holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.