पोलिसांच्या वाहनावर दगडफेक

By Admin | Updated: May 14, 2015 00:13 IST2015-05-14T00:13:02+5:302015-05-14T00:13:02+5:30

सरपंचपदाच्या निवडणुकीत दोन्ही गटांकडून येणाऱ्या दबावाला कंटाळून एक सदस्य अज्ञातस्थळी निघून गेला.

Stoning of police vehicles | पोलिसांच्या वाहनावर दगडफेक

पोलिसांच्या वाहनावर दगडफेक

वडगाव ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद : सदस्यानेच मागितले होते पोलीस संरक्षण
नांदगाव पेठ : सरपंचपदाच्या निवडणुकीत दोन्ही गटांकडून येणाऱ्या दबावाला कंटाळून एक सदस्य अज्ञातस्थळी निघून गेला. बुधवारी सरपंचपदाच्या निवडणुकीच्या वेळी पोलीस बंदोबस्तात तो ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचताच गावकऱ्यांनी पोलिसांच्या वाहनाला घेराव करून वाहनावर दगडफेक केली. यामुळे गावात तणाव निर्माण झाला. ही घटना बुधवारी नजीकच्या वडगाव माहोरे येथे घडली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस कुमक आणि दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले.
वडगाव (माहोरे) हे आदर्श गाव. निवडणुकीत श्रीखंडे व माहोरे गट समोरासमोर होते. निवडणुकीत श्रीखंडे गटाचे पाच तर माहोरे गटाचे चार सदस्य निवडून आले. श्रीखंडे गटातून निवडून आलेल्या सदस्यांमध्ये कोकिळा आठवले, बिना कावनपुरे, दिलीप पाटील, माधुरी लंगडे व नितीन गवळी यांचा तर माहुरे गटातून विजयी झालेल्यांमध्ये शशिकांत माहुरे, प्रफुल्ल माहुरे, रोशनी माहुरे व नंदा माहुरे यांचा समावेश आहे. येथील सरपंचपद एससी प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने श्रीखंडे गटाच्या नितीन गवळी यांची सरपंचपदी वर्णी लागण्याची शक्यता होती. मात्र, ९ मे पासून नितीन गवळी बेपत्ता झाला. विरोधकांनी नितीनचे अपहरण केल्याची चर्चा होती. बुधवारी सरपंचपदाची निवडणूक असल्याने सकाळी ११.३० वाजता पोलीस बंदोबस्तात नितीन गवळीला ग्रा.पं. कार्यालयात आणण्यात आले.

Web Title: Stoning of police vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.