दगडाने ठेचून हत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: July 20, 2015 00:05 IST2015-07-20T00:05:23+5:302015-07-20T00:05:23+5:30
दगडाने ठेचून युवकाची हत्या करणाचा प्रयत्न झाला. ही घटना शुक्रवारी रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास अंबागेट परिसरात घडली.

दगडाने ठेचून हत्येचा प्रयत्न
अंबागेट परिसरातील घटना : जखमी युवक नागपूरला 'रेफर'
अमरावती : दगडाने ठेचून युवकाची हत्या करणाचा प्रयत्न झाला. ही घटना शुक्रवारी रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास अंबागेट परिसरात घडली. गिरीधर (वय अंदाजे ३२) असे जखमीचे नाव आहे. त्याला रविवारी नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
अंबागेट परिसरातील सीताराम बिल्डिंगमागे रक्तबंबाळ अवस्थेत एक युवक असल्याची माहिती खोलापुरी गेट पोलिसांना शनिवारी रात्री ८.४५ वाजता मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन रक्तबंबाळ अवस्थेत युवकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळावर पोलिसांना रक्ताने माखलेला दगड आढळून आल्याने दगडाने ठेचून हत्येचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. जखमीच्या हातावर गिरीधर नाव गोंदल्याचे आढळले. वृत्त लिहिस्तोवर जखमीची पूर्ण ओळख पटली नव्हती.
रविवारी जखमी गिरीधरला नागपूर येथे हलविण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस शिपाई संजय देशमुख करीत आहेत. जखमी अवस्थेत आढळलेला युवक नेमका कोण, कुठला आणि हत्येचा प्रयत्न का झाला, अशा चर्चांना परिसरात ऊत आला आहे. (प्रतिनिधी)