वरुड, मोर्शी तालुक्यातील स्टोनक्रशर बेमुदत बंद
By Admin | Updated: November 17, 2015 00:16 IST2015-11-17T00:16:34+5:302015-11-17T00:16:34+5:30
महसूल विभागाने गौण खनिजाची रॉयल्टी वाढविल्याने गिट्टी खदानीवरील स्टोनक्रशर मालकांनी वरुड, मोर्शी तालुक्यातील स्टोनक्रशर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

वरुड, मोर्शी तालुक्यातील स्टोनक्रशर बेमुदत बंद
रॉयल्टी वाढविल्याचा निषेध : बांधकामे रखडली
वरुड : महसूल विभागाने गौण खनिजाची रॉयल्टी वाढविल्याने गिट्टी खदानीवरील स्टोनक्रशर मालकांनी वरुड, मोर्शी तालुक्यातील स्टोनक्रशर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबात उपविभागीय अधिकारी मोर्शी यांना मोर्शी तालुका खदान व क्रशर असोसिएशनच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे.या निर्णयामुळे दोन्ही ताुलक्यातील शासकीय तसेच खासगी बांधकामे रखडली आहेत.
निवेदनानुसार, महाराष्ट्र शासनाने गौण खनिजावर ११ मे २०१५ पासून १०० टक्के वाढ करुन पूवीर् २०० प्रति ब्रास असलेली गिट्टी आता ४०० रुपये प्रति ब्रासप्रमाणे विकण्याचे आदेश निर्गमित केले. मात्र शेजारच्या मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशात ही रॉयल्टी अद्यापही १५० रुपये प्रतिब्रास आहे. महाराष्ट्रात पूर्वी २०० रुपये ब्रासप्रमाणे असलेली रॉयल्टी ४०० रुपये प्रतिब्रास केल्याने हा अन्याय करणारा निर्णय आहे. राज्य शासनाने १०० टक्के केलेली वाढ कमी करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, महसूलमंत्री, खनिकर्म मंत्री तसेच पालकमंत्री यांना निवदेन देऊन केली होती. परंतु यावर राज्य शासनाने कोणताही निर्णय न घेता रॉयल्टची १०० टक्के वाढ कायम ठेवली. यामुळे अखेर मोर्शी, वरुड तालुका खदान व क्रशर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सभा घेऊन या दरवाढीचा निषेध केला. यावेळी गिट्टीसह गौण खनिजाची १०० टक्के दरवाढ रद्द करावी. अन्यथा १५ नोव्हेंबरपासून बेमुदत स्टोन क्रेशर बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी मोर्शी यांना देण्यात आली. यावेळी क्रेशर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र भातकुले, उपाध्यक्ष विजय शिरभाते, सचिव जितेंद्र भोवते, उमेश मंत्री, गोपाल मालपे, दामजी पटेल, सौरभ खवले, रतन लंगोटे, नितीन खेरडे, सागर बेलसरे, प्रमोद टाकरखेडे, जितेंद्र अग्रवाल, विनोद जायस्वाल, गिरीष कराळे, अमित खेरडे, राजेश खेरडे, संजय बरडीया, एल.एल.मालानी, सैय्यद जफरुनी मोहिद अहमद यांचा समावेश होता. स्टोन क्रेशर बेमुदत बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे तालुक्यातील बांधकामावर विपरीत परिणाम होवून कोट्यवधींच्या बांधकामाला खीळ बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)