चोरीच्या धान्यावर शिक्कामोर्तब?
By Admin | Updated: June 15, 2016 00:27 IST2016-06-15T00:27:16+5:302016-06-15T00:27:16+5:30
आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशातून सोळा चाकी ट्रकामध्ये आणलेले धान्य, वर्दळ नसलेल्या ठिकाणी आणून दुसऱ्या ट्रकमध्ये टाकण्यात येते.

चोरीच्या धान्यावर शिक्कामोर्तब?
नरेंद्र जावरे ल्ल परतवाडा
आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशातून सोळा चाकी ट्रकामध्ये आणलेले धान्य, वर्दळ नसलेल्या ठिकाणी आणून दुसऱ्या ट्रकमध्ये टाकण्यात येते. अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा प्रकार बाजार समितीच्या संचालकांनी रविवार उघडकीस आणला. मात्र क्षणातच त्याचा सेस फाडल्याच्या पावत्या पाठविल्याने या गोडेगबंगालात अनेक दिग्गजांचा सहभाग असल्याची चर्चा असून चौकशीची मागणी एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.
परतवाडा शहरातील वन विभागाच्या कार्यालयाकडून बेलखेडा गांवाकडे रास्ता जातो. तेथे एक गणपति मंदिर असून रविवारी दुपारी ३ वाजता आंध्र प्रदेश पासिंग असलेले ट्रक एपी-२१ टीझेड- ६८९९, सह तीन ट्रक मध्ये एक हजारपेक्षा अधिक गव्हाचे पोते भलेले होते. सदर धान्य एकांतात ट्रक उभे करून महाराट्र पासिंगच्या ट्रकमध्ये भरल्या जात असल्याचा प्रकार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनोहर जाधव, दिलीप शेळके व सहकाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी चौकशी केली असता हमाल व्यतिरिक्त सर्वांनी तेथून पळ काढला. परिणामी संशयाला आणखी बळ मिळाले.
संचालकांनी सादर बाब बाजार समितीचे सचिव मंगेश भेटाळू यांना विचारणा केली. त्यावर त्यांनी सदर प्रकाराशी बाजार समितीचा संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र संचालककांच्या मनात संशयाची पास चुकचुकली त्यांनी या धान्य हेराफेरीची माहिती घेतली. तेव्हा त्यांना थेट बाजार समितीचा सेस फाडल्याच पावत्या दाखविण्यात आल्या. मात्र हा माल कुठल्या शेतकऱ्यांचा आहे याची चौकशी त्या व्यापाऱ्यांकडून होणे गरजेचे झाले आहे. (प्रतिनिधी)
व्यापाऱ्यांमध्ये धावपळ, खळबळ
संचालक मनोहर जाधव व दिलीप शेळके यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली तेव्हा त्यांना सर्व बाबी संशयास्पद आढळून आल्यात. बाजार समितीच्या आवारात नसलेल्या गव्हाच्या तिन्ही ट्रकमधील हजारांवर पोते एकांतात दुसऱ्या ट्रकमध्ये टाकली जात असल्याने बाजार समितीचा लाखो रुपयांचा सेस बुडविण्याचा व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरू असल्याची चर्चा असून व्यापाऱ्यांना माहीत होताच क्षणात सेस फाडल्याच्या पावत्या पाठविण्यात आल्या, हे विशेष.
पोलिसात तक्रार
सदर धान्य शासकीय धान्य दुकानातील मोटी आहे किंवा कसे याचा शोध घेणे गरजेचे ठरले. टिंबर डेपो रोडमध्ये अवैधरीत्या चोरीचा माल ट्रकमध्ये पासिंग होत असल्याची तक्रार संचालकांनी बाजार समितीला दिली असून मंगळवारी सायंकाळी परतवाडा पोलिसात देण्याची प्रक्रिया सुरू होती. गव्हासह तूर-तांदळाचासुद्धा सेस बाजार समितीमध्ये पाडण्यात येत आहे. तर दुसरीकडे ट्रेडिंग कंपन्या हा माल आणत असून तो गोपनीय ठिकाणी ट्रकमध्ये का पलटी करण्यात येते हे न उलगडणारे कोडे ठरत आहे.