मृत जनावरांच्या हाडांच्या साठ्यामुळे दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:13 IST2021-07-29T04:13:13+5:302021-07-29T04:13:13+5:30

अमरावती : वलगाव मार्गावर एक शेतात अज्ञात व्यक्तीने मृत जनावरांचा हाडांचा साठा केला होता. यामुळे परिसरारत प्रचंड दुर्गंधी पसरल्याने ...

Stink due to stockpiles of dead animal bones | मृत जनावरांच्या हाडांच्या साठ्यामुळे दुर्गंधी

मृत जनावरांच्या हाडांच्या साठ्यामुळे दुर्गंधी

अमरावती : वलगाव मार्गावर एक शेतात अज्ञात व्यक्तीने मृत जनावरांचा हाडांचा साठा केला होता. यामुळे परिसरारत प्रचंड दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या. अखेर महापौरांनी दखल घेत निर्देश दिल्याने पशुसंवर्धन विभागाने जेसीबीच्या साह्याने हा ढीग हटविला. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

वलगाव मार्गावरील चांगापूर क्षेत्र, कृष्णार्पण कॉलनी, ब्रम्हचारी नगर, राधास्वामी सत्संग, महादेव नगर, देवी पॅलेस, गजानन नगर, शिक्षक नगर आदी परिसरालगच्या एक शेतात मृत जनावरांचा ढीग असल्याने दुर्गंधी पसरली होती. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. नागरिकांनी महापालिका प्रशासनाला तिनवेळा निवेदन दिले. मध्यंतरी हा प्रकार बंद झाला होता. पुन्हा हा प्रकार सुरू झाल्याने नागरिक संतापले. यात हिंदुत्ववादी संघटनेचाही सहभाग लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाने हा ढिग काढून कचरा डेपोत टाकण्यात आलेला आहे.

Web Title: Stink due to stockpiles of dead animal bones