एसटीची इसमाला धडक
By Admin | Updated: September 18, 2015 00:10 IST2015-09-18T00:10:34+5:302015-09-18T00:10:34+5:30
हातूर्णामार्गे वरुडला येणाऱ्या एसटी बसची राजुराबाजार येथे बसथांब्याजवळ एका वृध्द इसमाला धडक लागल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना ...

एसटीची इसमाला धडक
राजुराबाजार : हातूर्णामार्गे वरुडला येणाऱ्या एसटी बसची राजुराबाजार येथे बसथांब्याजवळ एका वृध्द इसमाला धडक लागल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ८.३० वाजता घडली. जखमीला उपचारार्थ ग्रामीण यग्णालयात दाखल करण्यात येऊन नंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, एसटीच्या धडकेत जखमी झालेल्या वृध्द इसमाचे नाव राजेश्वर रवाळे (५५ रा. राजुरा बाजार) असे आहे. गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास बस क्र. एम.एच.४०-९८७६ असून सदर बस वरुड ते लोणी हातुर्णामार्गे येत होती. बसथांब्याजवळ बस येताच राजेश्वर रवाळे नामक इसमाने गाडीला हात दाखविला. याचवेळी एसटीने धडक मारली. यामध्ये रवाळे गंभीर जखमी झाले. उपस्थित नागरिकांनी गर्दी केल्याने तणावाचे वातावरण झाले होते. जबाबदार नागरिकांनी मध्यस्थी केल्यांनतर चालक दिवाकर राऊत व वाहक रतिराम खंडारे यांनी एसटीमध्ये जखमीला घेऊन ग्रामीण रुग्णालयात आणले. उपचारानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. वृत्तलिहिस्तोवर पोलीस कारवाई झालेली नव्हती.