स्टीम सप्ताहात सर्वांचा सहभाग आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:13 IST2021-04-27T04:13:49+5:302021-04-27T04:13:49+5:30
जीवनशैली, नियमित वाफ घेणे, आदींचा अवलंब केला पाहिजे. त्याबाबत जनजागृतीसाठी प्रशासनाकडून स्टीम सप्ताह २६ एप्रिल ते २ मे दरम्यान ...

स्टीम सप्ताहात सर्वांचा सहभाग आवश्यक
जीवनशैली, नियमित वाफ घेणे, आदींचा अवलंब केला पाहिजे. त्याबाबत जनजागृतीसाठी
प्रशासनाकडून स्टीम सप्ताह २६ एप्रिल ते २ मे दरम्यान राबविण्यात येत असून सर्वांनी तो
यशस्वी करण्याचे आवाहन महापौर चेतन गावंडे यांनी केले.
कोरोना विषाणूला हरविण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. विविध
आरोग्यतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व कोरोनावरील अनुभव व अभ्यासानंतर असे निदर्शनास
आले की, कोरोना विषाणूला पूर्णपणे हरविण्यासाठी या लढाईत सर्वांचेच प्रयत्न आवश्यक
आहेत. प्रत्येक घरातून त्याचा कायमचा समूळ नायनाट करण्याचा प्रयत्न स्टीम सप्ताह
राबवून आपल्याला करायचा आहे. मास्क लावणे, अंतर ठेवणे, हात धुणे, सॅनिटायझरचा
वापर, तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोषक आहार, व्यायाम, सुसंगत जीवनशैलीचा
अवलंब यात वाफ घेणे ही कृतीही समाविष्ट आहे, असेही महापौर चेतन गावंडे यांनी सांगितले.
वाफ घेण्यासारखी बाब आपल्याला तशी परिचित आहे. सध्याच्या काळात तिचे
महत्त्व मोठे आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून तिचे महत्व प्रत्येकाच्या मनावर
बिंबवण्यासाठी उपयोग होणार आहे. या निमित्ताने प्रत्येकाने मी कोरोनाला हरविणारच हा
निर्धार केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
वाफ घेण्याबरोबरच व्हिटॅमिन सी, झिंक व मल्टिव्हिटॅमिन गोळ्यांचे सेवन, सकस
आहार व योग करण्याबाबतही विविध आरोग्यतज्ज्ञांनी सुचविले. दिवसातून तीन वेळा वाफ
घ्यावयाची आहे. आपल्या नाकावाटे वाफेस श्वसनाने शरीरात ओढणे व तोंडाने बाहेर
सोडण्याची ही प्रक्रिया १० वेळा करावयाची आहे. या प्रक्रियेकरिता दोन किंवा तीन मिनिटे
लागतात. साध्या पाण्याने वाफ घेतली तरीही उत्तम आहे. आरोग्य विभागातील विविध
आरोग्यतज्ज्ञांनी या वाफ घेण्याच्या पध्दतीला कोरोना विषाणूला हद्दपार करण्याकरिता
अत्यंत उपयोगी प्रक्रिया पडू शकते, असा विश्वास
महापौरांनी व्यक्त केला.