सोशल मीडियापासून अंतर ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:13 IST2021-04-07T04:13:52+5:302021-04-07T04:13:52+5:30

अमरावती : सोशल मीडियाचा अतिवापर हा आरोग्यासाठी घातक ठरणारा आहे. मोबाईलमुळे काही कुटुंबांत कलह झाल्याच्या तक्रारी पोलिसांत पाेहोचल्या आहेत. ...

Stay away from social media | सोशल मीडियापासून अंतर ठेवा

सोशल मीडियापासून अंतर ठेवा

अमरावती : सोशल मीडियाचा अतिवापर हा आरोग्यासाठी घातक ठरणारा आहे. मोबाईलमुळे काही कुटुंबांत कलह झाल्याच्या तक्रारी पोलिसांत पाेहोचल्या आहेत. सोशल मीडियामुळे नकारात्मक पसरत असल्याचे मत डॉ. प्रवीण देशमुख यांनी सांगितले. फेसबूक, व्हॉट्‌सअप, मॅसेंजर आदी सोशल मीडियापासून नागरिकांनी दोन हात दूर राहावे, असा सल्ला त्यांनी दिला.

-----------------

रोगावर नियंत्रण मिळविता येते

योगोपचार, व्यायामावर भर दिल्यास जीवनशैली नक्कीच बदल होतो. नियमित व्यायामाने विविध व्याधी दूर होते. रोगांवर नियंत्रण ठेवणे सुकर होते. सक्षम भारत, सक्षम समाज निर्मिती हा सुद्धा उद्देश पूर्ण करता येईल, असे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक अविनाश असनारे यांनी सांगितले.

-------------

कोरोनाकाळात मानसिक व्याधी वाढल्या

गत वर्षभरात कोराेनाकाळात मानसिक व्याधींमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: अभ्यासाच्या ताणाने काही विद्यार्थीदेखील नवे रुग्ण वाढले आहेत. कोरोनामुळे सर्व काही बंद झाले. शाळा-महाविद्यालयांना कुलूप लागले. त्यामुळे कोरोनाची धास्ती न बागळता आरोग्य जोपासण्यासाठी नियमित आहार घ्यावा. उन्हाळा असल्याने पोटभर पाणी प्यावे. ऋतुनिहाय फळांचा रस घ्यावा, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ आशिष साबू यांनी सांगितले.

Web Title: Stay away from social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.