युवा सेनेने जाळले भाजप नेत्यांचे पुतळे
By Admin | Updated: January 28, 2017 00:21 IST2017-01-28T00:21:24+5:302017-01-28T00:21:24+5:30
शिवसेना-भाजपमध्ये युतीची शक्यता मावळल्याची बातमी शहरात धडकताच संतापलेल्या युवासेनेच्या

युवा सेनेने जाळले भाजप नेत्यांचे पुतळे
अमरावती : शिवसेना-भाजपमध्ये युतीची शक्यता मावळल्याची बातमी शहरात धडकताच संतापलेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे पुतळे जाळून राजकमल चौकात युतीचा प्रतिकात्मक अंत्यविधी करण्यात आला.
शुक्रवारी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरुद्ध घोषणाबाजी करुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, किरीट सोमय्या यांच्या पुतळा जाळण्यात आला. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यावेळी रावसाहेब दानवे, आशिष शेलार मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी पराग गनथडे, राहुल नावंदे, शुभम जवंजाळ, अश्विन कांडलकर, संदीप गंधे यांच्यासह असंख्य युवासेनेच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. युवा सेनेच्यावतीने भारतीय जनता पक्षाच्या धोेरणांचा यावेळी तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला. (प्रतिनिधी)