अल्पवयीन प्रेमीयुगुलाच्या आत्महत्येप्रकरणी मृतांच्या आई-वडिलांचे बयाण नोंदविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:12 IST2021-05-22T04:12:57+5:302021-05-22T04:12:57+5:30

अमरावती : एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या अल्पवयीन प्रेमीयुगुलाशी संबंधित सुसाईड नोट वा अन्य पुरावा घटनास्थळी न आढळल्याने ...

Statement of parents of the deceased in the case of suicide of a minor lover will be recorded. | अल्पवयीन प्रेमीयुगुलाच्या आत्महत्येप्रकरणी मृतांच्या आई-वडिलांचे बयाण नोंदविणार

अल्पवयीन प्रेमीयुगुलाच्या आत्महत्येप्रकरणी मृतांच्या आई-वडिलांचे बयाण नोंदविणार

अमरावती : एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या अल्पवयीन प्रेमीयुगुलाशी संबंधित सुसाईड नोट वा अन्य पुरावा घटनास्थळी न आढळल्याने या प्रकरणातील गूढ कायम आहे. मृताच्या आई-वडिलांचे व घरातील सदस्यांचे बयाण शनिवारी फ्रेजरपुरा पोलीस नोंदविणार असल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांनी दिली.

फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील महादेवखोरी परिसरातील जंगलात १६ वर्षीय मुलगी व १७ वर्षीय मुलाने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास उघडकीस आले. आत्महत्येपूर्वी मुलगा राजापेठ ठाण्याच्या हद्दीतून, तर मुलगी फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतून हरविल्याची तक्रार मृताच्या नातेवाइकांनी १४ मे रोजी नोंदविली होती. त्यांचा तपास घेणाऱ्या पोलिसांना गुरुवारी रात्री महादेवखोरीतील जंगलात मृतदेहच आढळले. शनिवारी शवविच्छेदनानंतर दोघांवर नातेवाइकांनी वेगवेगळे अंत्यसंस्कार केले. त्यांनी आत्महत्या का केली, याचे गूढ उकलण्याकरिता पोलीस त्यांच्या आई-वडिलांचे व जवळच्या नातेवाइकांचे बयाण नोंदविणार आहेत.

Web Title: Statement of parents of the deceased in the case of suicide of a minor lover will be recorded.