राज्यसेवा पूर्वपरीक्षा आज, १०,८३८ उमेदवार, शहरात ३६ केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:13 IST2021-03-21T04:13:11+5:302021-03-21T04:13:11+5:30
अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा पूर्वपरीक्षा रविवारी शहरातील ३६ केंद्रांवर होणार आहे. १०,८३८ उमेदवार ही परीक्षा देणार आहे. ...

राज्यसेवा पूर्वपरीक्षा आज, १०,८३८ उमेदवार, शहरात ३६ केंद्र
अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा पूर्वपरीक्षा रविवारी शहरातील ३६ केंद्रांवर होणार आहे. १०,८३८ उमेदवार ही परीक्षा देणार आहे. या पाश्वर्भूमीवर प्रशासनाची जय्यत तयारी झालेली आहे. दरम्यान उमेदवारांसाठी गाईडलाईन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा शुक्रवारी जाहीर करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात ३६ परीक्षा केंद्रात दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. पहिल्या सत्रात सकाळी १० ते १२ व दुसऱ्या सत्रात दुपारी ३ ते ५ या वेळेत परीक्षा होईल. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड, मास्क, ग्लोव्हज व सॅनिटायझर पाऊच आयोगाद्वारा पुरविण्यात येणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे दिलेल्या माहितीनुसार शहरात विद्याभारती कॉलेज, गर्व्हमेंट पॉलीटेक्निक, जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा, कॅम्प, गोल्डन किड्स इंग्लिश प्रायमरी स्कूल, होलीक्रास इंग्लिश हायस्कूल, होलीक्रास मराठी हायस्कूल, गणेशदास लाहोटी विद्यालय, केशरभाई लाहोटी महाविद्यालय, आयटीआय, मोर्शी रोड, शिवाजी मल्टीपरपझ हायस्कूल, नूतन कन्या शाळा व महाविद्यालय, न्यू हायस्कूल मेन ज्युनियर कॉलेज, डॉ. पंजाबराव देशमुख पॉलीटेक्निक, रुरल इंस्टिट्युड, सिंधी हिन्दी हायस्कूल रामपुरी कॅम्प, रामकृष्ण क्रीडा विद्यालय, एचव्हीपीएम, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, मनीबाई गुजराथी हायस्कूल, भारतीय महाविद्यालय, राजापेठ, समर्थ माध्यमिक विद्यालय, ब्रिजलाल बियाणी सायन्स कॉलेज, नारायनदास लढ्ढा हायस्कूल, भंवरीलाल सामरा हायस्कूल, सिपना इंजीनिअरिंग कॉलेज, पी.आर पोटे कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग येथे चार केंद्र, ज्ञानमाता हायस्कूल कॅम्प, प्रो राम मेघे कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग, विर्दभ, युथ वेल्फेअर सोसायटी, राजेश्वर युनियन हायस्कूल, सेंट फ्रांसीस स्कूल, श्रीमती नरसम्मा आर्ट ॲन्ड सायन्स कॉळेज किरणनगर या केंद्रावर ही परीक्षा होणार आहे.
पाईंटर
परीक्षेसाठी उपलब्ध मनुष्यबळ
समन्वय अधिकारी : ०९
उपकेंद्र प्रमुख : ३६
पर्यवेक्षक : १४५
समवेक्षक : ५१०
लिपिक : ८३
शिपाई :८३
बॉक्स
उमेदवारांना मिळणार ही किट
परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश करतांना उमेदवारांना तीन पदरी मास्क लावणे आवश्यक आहे. परीक्षा कक्षामध्ये मास्क, सॅनिटायझरचे पॉऊच असलेली एक किट उपलब्ध करण्यात येईल व ही दोन्ही सत्राकरिता वापरावी लागेल. उमेदवारांनी हात सतत सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे. आवश्यक फिजिकल डिस्टन्स राहण्याचे दृष्टीने परीक्षा उपकेंद्रावरील माहिती फलक, सांकेतिक चिन्हे, भित्तिपत्रिका आदींवरील सूचनांचे पालन करणे उमेवारांना बंधनकारक आहे.
बॉक्स
परीक्षा केंद्रावर फिजिकल डिस्टन्स अनिवार्य
परीक्षा संपल्यावर उपकेंद्रातून बाहेर जाताना फिजिकल अंतर कायम राखणे उमेदवारांना अनिवार्य आहे. याशिवाय वापरलेले टिश्यू पेपर, मास्क, हातमोजे, सॅनिटाईज पाऊज, आदी वस्तू उपकेंद्रावर आच्छादित कुंडीत टाकणे महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय या सर्व अनुषंगाने प्रवेशपत्रावर दिलेल्या सूचनांचे पालन उमेदवारांनी करणे महत्त्वाचे असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी सांगितले.