महापालिका आयोजित करणार राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा
By Admin | Updated: December 12, 2015 00:07 IST2015-12-12T00:07:19+5:302015-12-12T00:07:19+5:30
महापौर कला महोत्सव, राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेच्या आयोजनासह विविध विकासकामांना शुक्रवारी स्थायी समितीने मंजुरी दिली.

महापालिका आयोजित करणार राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा
स्थायी समितीचा निर्णय : इतवारा बाजारात राबविणार प्रोजेक्ट
अमरावती : महापौर कला महोत्सव, राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेच्या आयोजनासह विविध विकासकामांना शुक्रवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. स्थानिक इतवारा बाजारात ‘आॅर्गेनिक मॅनेजमेंट सिस्टिम’ हा पायलट प्रोजेक्ट निर्माण करण्याला मान्यता प्रदान करण्यात आली.
स्व.सुदामकाका देशमुख सभागृहात स्थायी सभापती विलास इंगोले यांच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीला दिगंबर डहाके, कुसूम साहू, योजना रेवस्कर, राजेंद्र तायडे, कांचन उपाध्याय, सुनीता भेले, भारत चव्हाण, शेख हमीद शद्दा, अंजली पांडे, अजय गोंडाणे, सारिका महल्ले, वंदना हरणे, हाफिजाबी युसूफ शहा, तुषार भारतीय आदी सदस्य उपस्थित होते.
रस्त्याच्या कामासाठी मंजुरी
अमरावती : कार्यक्रमपत्रिकेवरील विषय हाताळताना येथील हमालपुऱ्यात पेव्हिंग ब्लॉक बसविणे व सी.सी.रस्ता तयार करण्यासाठी ३९ लाख ७४ हजार रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. बिच्छुटेकडी येथे सी.सी. रोड आणि सी.डी.वर्कसाठी ई-निविदा प्रक्रियेने ४८ लाख २५ हजार रुपयांची विकासकामे, प्रभाग क्र. ३१ अंतर्गत दरकरारची कामे, नवसारी येथे पुंडलिक बाबानगर, उज्ज्ज्वल कॉलनी व अरुण कॉलनी येथे क्राँक्रीट रस्ता निर्मितीसाठी ३३ लाख ८३ हजार रुपयांच्या कामांना मान्यता प्रदान करण्यात आली. मौजे गंभीरपूर सर्व्हे क्र. ३०/१ या खासगी जागेमधील १८.०० मीटर डी. पी.रुंद रस्त्याखालील एकूण १६५६.०० जागेचा मोबदला ८ लाख ७६ हजार ९६ रुपये अदा करण्याला मंजुरी प्रदान करण्यात आली. महापौर कला महोत्सवांतर्गत २६ डिसेंबर रोजी आयोजित अ.भा.मुशायरा व कवी संमेलनासाठी लागणाऱ्या पाच लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी प्रदान कोली. महापौर राज्यस्तरीय श्री शरीर सौष्ठव स्पर्धा येथील आझाद हिंद मंडळात होणार आहे. हरिभाऊ कलोती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून त्याकरिता तीन लाखांच्या खर्चाला स्थायी समितीत मान्यता देण्यात आली.