शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ‘जेम पोर्टल’ खरेदीचा बोजवारा, कोट्यवधींची धूळधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 19:54 IST

शासकीय, प्रशासकीय कार्यालयांनी आवश्यक वस्तू व सेवा हे केंद्र सरकारच्या ‘जेम पोर्टल’वरूनच खरेदी करण्याची नियमावली आहे. परंतु, शासन निधी व अनुदानाचे वेगवेगळे तुकडे पाडून मर्जीनुसार साहित्य खरेदी केले जात आहे.

अमरावती : शासकीय, प्रशासकीय कार्यालयांनी आवश्यक वस्तू व सेवा हे केंद्र सरकारच्या ‘जेम पोर्टल’वरूनच खरेदी करण्याची नियमावली आहे. परंतु, शासन निधी व अनुदानाचे वेगवेगळे तुकडे पाडून मर्जीनुसार साहित्य खरेदी केले जात आहे. यात आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय आणि वनविभाग आघाडीवर असल्याचे सर्वश्रूत आहे.केंद्र शासनाने राष्ट्रीय खरेदी धोरणांतर्गत खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात बदल केले आहे. त्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने २४ आॅगस्ट २०१७ रोजी शासनादेश जारी करून केन्द्र सरकारने विकसित केलेल्या गव्हर्न्मेंट ई- मार्केंट प्लेक्स या पोर्टलवरून वस्तू, सेवा खरेदी करण्याची सक्ती केली आहे. या पोर्टलवर पाच हजार ते ५० हजार रूपयांपर्यंतची खरेदी, योग्य दर्जा, विनिर्देश व पुरवठा कालावधी पूर्तता करणा-या पूरवठादारांकडून खरेदी करता येते. मात्र, आवश्यक वस्तू, सेवा ‘जेम पोर्टल’वर उपलब्ध नसल्यास किंवा पुरवठादारांची स्थानिक पातळीवरील वस्तू पुरवठा करण्याची तयारी नसल्यास अशा वस्तू व सेवांची खरेदी त्या- त्या आर्थिक वर्षात ५० हजारांपेक्षा अधिक नसावी, असे नमूद आहे. तीन लाखांच्यावर वस्तू, सेवा खरेदी असल्यास ‘जेम पोर्टल’वरूनच ती खरेदी व्हावे, अशी नियमावली आहे. परंतु, खरेदी अधिकारी मोठे लहान आदेशांमध्ये विभागणी करीत असून, त्याच विक्रेत्यांकडून दरपत्रकाच्या माध्यमातून खरेदी करीत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. परिणामी आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय आणि वनविभागात कोट्यवधींचे घोटाळे बाहेर येत आहेत. शासननिधी, अनुदानाची परस्पर विल्हेवाट लावण्यात अधिका-यांची साखळी आहे. दरपत्रकाचा आधार घेत विभागप्रमुख असलेले अधिकारी हे मर्जीतील पुरवठादार, कंत्राटदारांकडून वस्तू, सेवांचा पुरवठा करीत असल्याचे चित्र सर्वच विभागांमध्ये आहे. 

महालेखाकार कार्यालयांचे लेखाआक्षेपविशेषत: वनविभागाने ई-टेंडर किंवा ‘जेम पोर्टल’वरून वस्तू, साहित्य खरेदी न केल्याप्रकरणी नागपूर येथील महालेखाकार कार्यालयाने गतवर्षी लेखाआक्षेप नोंदविले आहे. मेळघाटसह यवतमाळ, अकोला, नागपूर येथे वनविभागामार्फत झालेल्या कामांची चौकशी आरंभली आहे. विकासकामे, वस्तू, सेवा खरेदीबाबत शासनाने धोरण निश्चित केले असतानादेखील संबंधित अधिकारी नियमावलीचे पालन का करीत नाही, हे गुपित आहे.

‘जेम पोर्टल’ची आॅनलाईन नोंदणी का नाही?राज्य शासनाने वस्तू, सेवा खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘जेम पोर्टल’ वरच मागणी नोंदवावी, असे निर्देश दिले आहे. मात्र, बोटावर मोजण्याइतक्याच विभागांनी ‘जेम पोर्टल’वर आॅनलाईन नोंदणी केली आहे. वस्तू, सेवांची खरेदी या पोर्टलवरून केल्यास वर्षांनुवर्षांपासून दरपत्रकाचा आधार घेत होणारे आर्थिक व्यवहार बंद पडतील. त्यामुळे बहुतांश विभागाने ‘जेम पोर्टल’ची आॅनलाईन नोंदणी अनिवार्य आहे

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र