शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
2
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
3
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
4
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
5
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
6
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
7
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
8
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
9
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
10
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
11
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
12
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
13
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
14
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
15
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
16
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
17
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
18
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
19
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
20
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी

राज्याच्या वनविभागाला आता स्वतंत्र ध्वज; सैन्यदल, सीबीआय, पोलिस यांच्यानंतर मिळाला बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 20:21 IST

देशात ३३ टक्के वनाच्छादित क्षेत्र निर्माण करण्यासाठी वनविभागाचा महत्त्वाचा रोल आहे.

- गणेश वासनिक

अमरावती : देशाचे तीनही सैन्यदल, सीबीआय व पोलीस विभागानंतर राज्याच्या वनविभागाला स्वतंत्र ध्वज मिळणार आहे. त्यामुळे वनविभागाची नवी ओळख निर्माण होणार आहे. वनविभाग वने आणि वन्यजिवांचे संरक्षण करण्यासह पर्यावरण आणि जैवविविधता अबाधित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

देशात ३३ टक्के वनाच्छादित क्षेत्र निर्माण करण्यासाठी वनविभागाचा महत्त्वाचा रोल आहे. याशिवाय पर्यटनक्षेत्रातही कमालीची कामगिरी बजावत आहे. जंगलाचे वैभव संपन्न ठेवण्यासाठी वनाधिकारी, वनकर्मचारी मोलाची भूमिका बजावतात. स्वतंत्र ध्वज मिळणार असल्याने वनविभागाच्या शिरपेचात मानाच तुरा खोवला आहे.

हिरव्या, लाल रंगाचा आहे ध्वज

वनविभागाचा ध्वज हा हिरव्या, लाल रंगाचा आहे. यात राजमुद्रा आणि वनविभागाचे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे ब्रीद वाक्य अंकित आहे. १९८८ च्या राष्ट्रीय वननीतीमध्ये हिरवा रंग हा ‘सिम्बॉल’ वनविभागाला प्राप्त झाला. लाल रंग म्हणजे ‘धरती माता’. या धरतीमुळेच सर्व जण श्वास घेतात. ध्वजात ‘रिफ्लेक्ट’ रंग हा गोल्डन असून, वने, पाणी, हवा, वन्यजिवांचे संरक्षण या सोनेरी कामगिरीसाठी हा रंग ठेवण्यात आला आहे.

डीएफओ ते पीसीसीएफ यांच्या वाहनांवर असेल ध्वज

उपवनसंरक्षक (डीएफओ) ते प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) या आयएफएस अधिकाऱ्यांच्या वाहनांवर ध्वज लावण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयात देशाचा तिरंगा आणि वनविभागाचा ध्वज असे दोन्ही लावण्यात येतील. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना कार्यालयात टेबलवर हा ध्वज लावण्याची मुभा असणार आहे.वनविभागाला आता स्वतंत्र ध्वजामुळे नवी ओळख मिळणार आहे. ड्रेस कोड, कॅडरबेस, शिस्तीचा हा विभाग आहे. स्वतंत्र ध्वज असावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. लवकरच या ध्वजाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात येईल.- संजय राठोड, वनमंत्री, महाराष्ट्र.

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलMaharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावती