जिल्ह्यात १६ मॉडेल स्कूलमध्ये मिळणार अत्याधुनिक सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:13 IST2021-04-04T04:13:10+5:302021-04-04T04:13:10+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या मॉडर्न स्कूलमध्ये शाळांना सर्व अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार आहे. त्यासाठी पदाधिकारी सदस्य अधिकारी ...

जिल्ह्यात १६ मॉडेल स्कूलमध्ये मिळणार अत्याधुनिक सुविधा
अमरावती : जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या मॉडर्न स्कूलमध्ये शाळांना सर्व अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार आहे. त्यासाठी पदाधिकारी सदस्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील १६ शाळा मॉडेल स्कूल केल्या जाणार आहेत. या शाळा नवीन वर्गखोल्या बांधकाम केले जाणार आहे. या वर्गखोल्या पुरेशी खेळती हवा आरामशीर बैठक व्यवस्था असणार आहे. पोषण आहारासाठी सर्व सोयीयुक्त स्वयंपाकगृह असणार आहे. तसेच स्वच्छतागृह आधुनिक पद्धतीने बांधले जाणार आहे. दिव्यांगांसाठी कमोड टॉयलेट रॅम हॅन्डरेल असणार आहे. १२० विद्यार्थ्यांच्या पुढे प्रत्येक किती जणांसाठी एक शौचालय बांधण्यात येणार आहे. विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात हॅन्ड वॉश स्टेशनची व सोय केली जाणार आहे. प्रत्येक शाळेत पिण्याचे पुरेसे व शुद्ध पाणी दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. वर्गखोल्या व्हरांडा संरक्षक भिंत आतील व बाहेरील बाजू चित्रमय केले जाणार आहे. प्रवेशद्वार गेट कमान ध्वजस्तंभ सहित स्टेज बगीचा, परसबाग, ऑक्सिजन पार्क, कचरा व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग पार्किंग व्यवस्था अशा अनेक सुविधा दिल्या जाणार आहे. शाळांना बेंच टेबल-खुर्ची कपाट नवीन दिले जाणार आहे.
---------------
कोट
जिल्ह्यातील शाळा आदर्श भरण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी शिक्षकाचे सर्वजण कष्ट घेत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या मार्गदर्शनात उत्कृष्ट मॉडेल शाळा तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- सुरेश निमकर,
सभापती, शिक्षण समिती
००००००००००००००००००००
(नवीन बातमी)
गणवेश देताना शाळांची कसरत!
यंदा लाभार्थ्यांना एकच ड्रेस मंजुरीने पोशाख अडचणीत
अमरावती : ३१ मार्चपर्यंत शालेय गणवेशाचे पैसे खर्च करणे बंधनकारक असल्याने सध्या प्रत्येक शाळेमध्ये शालेय गणवेश शिवून विद्यार्थ्यांना देण्याची लगबग सुरू आहे. मात्र, यावर्षी खुल्या प्रवर्गातील मुलांनाही एक पोशाख देताना शाळांची चांगलीच कसरत होत आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यांना प्रवर्गातील मुला-मुलींना दोन ऐवजी एकच गणवेश मंजूर झाल्याने या गणवेशामधूनच काटकसर करत खुल्या प्रवर्गाच्या मुलांना गणवेश देताना यावेळी मात्र शाळांना आर्थिक ताण येत आहे.
प्रत्येक वर्षी पहिली ते आठवीच्या सर्व मुली त्याचप्रमाणे अनुसूचित जाती व जमाती तसेच दारिद्र्यरेषेखालील मुले यांना प्रत्येकी दोन ड्रेस दिले जातात. कोरोनामुळे यंदा सात ते आठ महिने शाळाच बंद राहिल्याने आता वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात दोनऐवजी अशा पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक पोशाख मंजूर करण्यात आला आहे. एका पोषाखासाठी प्रत्येकी ३०० रुपये निधी देखील शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमा झाला आहे. शाळा व शाळा व्यवस्थापन समित्या यांनी आजवर अपात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान एक तरी देण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्यामध्ये मंजूर विद्यार्थ्यांच्या इयत्ता व शरीर यष्टी नुसार कमी दरामध्ये सुद्धा ड्रेस बसवून त्यातून थोडे थोडे पैसे वाचवत या अन्य विद्यार्थ्यांना दोन ऐवजी एक ड्रेस दिला जातो. मात्र यंदा मुळातच पात्र लाभार्थ्यांना एक ड्रेस असल्याने उर्वरित मुन्ना ड्रेस आता यात ॲडजेस्ट होत नाही. आता अशावेळी पालकांकडे पैसे मागावे तर आजपर्यंत आमच्याकडे पैसे घेतले नाहीत, तर आत्ताच पैसे कसे? काहीही शंका व चर्चा झडू शकतील. त्यामुळे काही ठिकाणी शालेय व्यवस्थापन समित्या शिक्षक स्टॉप तर काही ठिकाणी गावातील सामाजिक, राजकीय नेते किंवा संस्था यांच्या योगदानातून हा विषय मार्गी लावण्यात येत आहे.
बॉक्स
भेदभाव दर्शवणारा उपक्रम
ओपन प्रवर्गातील मुलीचा फक्त या पोशाखात या लाभापासून प्रतिवर्षी वंचित राहतात. एका शाळेतील एकाच वर्गातील काही विद्यार्थ्यांना गणवेश मिळतो व त्याच वेळी काहींना मिळत नाही. यातून संबंधित विद्यार्थ्यांची नकारात्मकता मानसिकता तयार होऊ शकते व या प्रकारामुळे भेदभाव देखील बालमनावर घर करू शकतो. त्यामुळे योजनेतील हा मोठा दोष आहे तो दूर करणे हे गरजेचे आहे.
- प्रमोद रोकडे, पालक
००००००००००००००००००००००००
(नवीन बातमी)
उन्हाचा तडाखा....!
अमरावती : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. सकाळपासून उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. जिल्ह्यात उन्हाचा पारा ४० अंशावर गेला आहे. वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरात कामासाठी येणारे नागरिक झाडांचा तसेच सावलीचा आसरा घेत काही वेळ विसावा घेत आहेत. नेहमीच नागरिकांच्या गर्दीत हरवणाऱ्या जवाहर रोड राजकमल चौक इर्विन चौक, इतवारा बाजार जिल्हाधिकारी कार्यालय परिसर या वर्दळीच्या ठिकाणी आता दुपारच्या वेळी गर्दी कमी होत आहे. उन्हामुळे जीवाची लाही लाही होऊ लागल्याने कोल्ड्रिंकच्या गाड्यांवर नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी घराबाहेर पडताना गॉगल, टोपी, स्कार्फ कोरोनापासून संरक्षण म्हणून तोंडाला मास्क लावून बाहेर सायंकाळच्या वेळी नागरिक बाहेर पडत आहेत. येत्या आठवडाभरात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सरासरी तापमान ३७ ते ४१ अंशापर्यंत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाची झळ सोसावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.