पॅसेंजर सुरू करा रे बाबा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:56+5:302021-07-07T04:15:56+5:30

अमरावती : ‘बाबूसाहेब मूर्तिजापूरले जायचं आहे. पॅसेंजरचे तिकीट द्या बरं’, दमलेल्या वृद्धाने दहा रुपये खिशातून काढत बडनेरा रेल्वे स्थानकाच्या ...

Start the passenger, Ray Baba. | पॅसेंजर सुरू करा रे बाबा..

पॅसेंजर सुरू करा रे बाबा..

अमरावती : ‘बाबूसाहेब मूर्तिजापूरले जायचं आहे. पॅसेंजरचे तिकीट द्या बरं’, दमलेल्या वृद्धाने दहा रुपये खिशातून काढत बडनेरा रेल्वे स्थानकाच्या काऊंटरच्या आत टाकले. रखरखत्या उन्हातून चालतच आल्याने त्याने खांद्यावरचा शेला घाम चेहऱ्याचा पुसायला काढला. ‘लॉकडाऊन हटलं म्हणे’, असे रेल्वे स्थानकावर नसलेल्या गर्दीचा अंदाज घेत म्हणाला. दुपारचे दीड वाजले होते. त्यामुळे एव्हाना पॅसेंजरसाठी गर्दी व्हायला हवी होती. ‘पण काका, पॅसेजर गाड्या अजून सुरू झाल्या नाहीत. एक्स्प्रेसचे तिकीट देऊ काय’, असे तिकीट आरक्षण खिडकीवरील कर्मचारी म्हणाला. त्यासाठी ४५ रुपये मागितले. मात्र, ‘लुटतं काय आम्हाले? कोरोना कमी झाला, पॅसेंजर गाड्या चालू करा म्हणा गपगुमान. बुडीले लय दिवसाचं पायलं नाही’, असे म्हणत तो वृद्ध आल्यापावली परत गेला.

Web Title: Start the passenger, Ray Baba.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.