राष्ट्रसंतांच्या विचाराने नवा प्रवास सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 23:58 IST2017-10-11T23:57:59+5:302017-10-11T23:58:16+5:30
राज्यभरातील दीडशेहून अधिक पालख्या हजारो गुदेवभक्तांसह दाखल झालेल्या पालख्यांची मांदियाळी गुरुकुंजात झाली. या पालख्यांचे स्वागत आमदार यशोमती ठाकूर यांनी केले.

राष्ट्रसंतांच्या विचाराने नवा प्रवास सुरू करा
लोकमत न्यूज नेटवर्क
गुरुकुंज मोझरी : राज्यभरातील दीडशेहून अधिक पालख्या हजारो गुदेवभक्तांसह दाखल झालेल्या पालख्यांची मांदियाळी गुरुकुंजात झाली. या पालख्यांचे स्वागत आमदार यशोमती ठाकूर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आत्मसात करून नव्या प्रवासाला सुरुवात करा, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले.
मंगळवारी लाखो गुरुदेवभक्तांनी राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण केली. बुधवारी ४९ व्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता होणार असून यासाठी गुरुकुंजात भक्तांनी हजेरी लावली होती. सर्वधर्मसमभावचा संदेश देत मोझरी गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला व महासमाधीला प्रदक्षिणा घालून प्रस्थान करतात. शेकडो पालखींचे भाविक भक्त, अनुयायी, महिला मंडळ, भजनी मंडळ यांचे स्वागतानंतर शाल, श्रीफळ, टोप्या, व प्रसाद वाटून निरोप दिला गेला. भक्तिमय वातावरणात हा सोहळा भजन, दिंडी, महिलांची फुगडी याने भक्तीत रंगला. आमदार यशोमती ठाकूर यांनीदेखील यात सहभागी होत भक्तांचा आनंद द्विगुणित केला.
यावेळी गुरुदेव भक्त, मोझरीच्या सरपंच विद्या बोडखे, पं.स. सदस्य रंजना पोजगे, गुरुदेव नगरचे सरपंच बबलू मक्रमपुरे, सुरेश साबळे, गुरुदेव सेवा मंडळाचे रघुनाथ वाडेकर, पंकज देशमुख, डेहनकर, आशिष खारकर, सुमित खारोडे, संजय बांते, प्रफुल्ल देशमुख, नरेंद्र कांडलकर, रामचंद्र क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, गावकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.