मुंबई-अमरावती विमानफेरी सुरु करा
By Admin | Updated: April 22, 2015 23:59 IST2015-04-22T23:59:56+5:302015-04-22T23:59:56+5:30
बेलोरा विमानतळाहून मुंबई-अमरावती-नागपूर ही विमानफेरी सकाळी- सायंकाळी सुरु करण्याची मागणी आ. रवी राणा यांनी ...

मुंबई-अमरावती विमानफेरी सुरु करा
अमरावती : बेलोरा विमानतळाहून मुंबई-अमरावती-नागपूर ही विमानफेरी सकाळी- सायंकाळी सुरु करण्याची मागणी आ. रवी राणा यांनी सिव्हिल एव्हिएशन केंद्रीयमंत्री अशोक गजापती राजू पुसापती यांच्याकडे दिल्ली येथे एका बैठकीदरम्यान केली.
बेलोरा विमानतळाच्या धावपट्टीचा विकास करण्यासाठी निधी मंजूर करण्यासोबतच बेलोरा धावपट्टीवरुन सकाळची मुंबई-अमरावती-नागपूर विमानफेरी सकाळी आणि सायंकाळच्या वेळी नियमित सुरु करावी, अशी मागणी त्यांनी केली. कारण अमरावतीजवळील नांदगावपेठ येथील औद्योगिक वसाहत परिसरात नवनवीन उद्योग सुरु होत असल्याने मोठ्या उद्योगपतींनादेखील विमानसेवा सुरु केल्यास लवकरच महानगरात जाता येईल. विदर्भातील मुले-मुली पायलट व एअर होस्टेसचे प्रशिक्षण घेऊ शकतील. दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीला क्रिष्णा किशोरे, आप्पाराव, सचिव सोमा सुंदरम, श्रीनिवास यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)