लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका प्रशासनाने गंभीरतेने घेऊन पाच दिवसांत २५० हून अधिक अनधिकृत होर्डिंग जप्त केले व २० एफआयआर नोंदविले. दुसरीकडे पुन्हा होर्डिंग लागणे सुरू असल्याने कारवाईत सातत्य असणे लोकसुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे.विभागीय क्रीडा संकुलासमोरील रस्त्याच्या दुभाजकावर अनेक व्यावसायिकांनी अनधिकृत जाहिराती लावल्या आहेत. अनेकदा हवेमुळे हे फ्लेक्स कोसळल्याने वाहनचालकांची त्रेधा उडाली. सुदैवाने अद्याप यामुळे अपघाताची नोंद नाही. पंचवटीकडे जाणाऱ्या या मार्गावर काँक्रीटीकरणाची कामे सुरू असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची नेहमीच कोंडी होते. विशेष म्हणजे, या ठिकाणी उड्डाणपुलावरून वेगाने वाहने येतात. या जाहिरातींच्या फ्लेक्समुळे वळणावरील वाहने दिसत नाहीत. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. राजकमल चौकातील उड्डाणपूल तसेच रेल्वे पुलावर मोठे अनधिकृत होर्डिंग कायम असतात. याठिकाणीदेखील हवेमुळे हे होर्डिंग उडत असल्याने रस्त्याने चालणाऱ्या नागरिकाच्या किंवा वाहनचालकावर बेतू शकते. त्यामुळे या प्रकाराचीदेखील गंभीर दखल महापालिका प्रशासनाने घेणे महत्त्वाचे आहे.
होर्डिंग लावणे सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:02 IST
महापालिका प्रशासनाने गंभीरतेने घेऊन पाच दिवसांत २५० हून अधिक अनधिकृत होर्डिंग जप्त केले व २० एफआयआर नोंदविले. दुसरीकडे पुन्हा होर्डिंग लागणे सुरू असल्याने कारवाईत सातत्य असणे लोकसुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे.
होर्डिंग लावणे सुरूच
ठळक मुद्देअपघाताला निमंत्रण : रस्ता दुभाजकांवर अनधिकृत जाहिराती; यांनाही प्रतिबंध हवाच