स्टार बसला नव्या गावांची जोड

By Admin | Updated: January 4, 2015 23:03 IST2015-01-04T23:03:00+5:302015-01-04T23:03:00+5:30

केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनर्निर्माण योजनेच्या अनुदानातून महापालिकेला ६४ स्टार बसेस मिळणार आहेत. या बसेस प्रशासन खासगी तत्त्वावर चालविणार असले

Star bus connects new villages | स्टार बसला नव्या गावांची जोड

स्टार बसला नव्या गावांची जोड

सीमांचा विस्तार : मार्ग निश्चितीनंतर आरटीओंकडे प्रस्ताव
अमरावती : केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनर्निर्माण योजनेच्या अनुदानातून महापालिकेला ६४ स्टार बसेस मिळणार आहेत. या बसेस प्रशासन खासगी तत्त्वावर चालविणार असले तरी भविष्याचा वेध घेत शहरालगतच्या मुख्य गावांपर्यंत बसेस पोहोचविण्याची संकल्पना आहे. त्यानुसार शनिवारी बैठक पार पडली. यात नगरसेवकांना मार्ग, थांब्याची माहिती देण्याचा निर्णय झाला.
नागपूर, पुणेच्या धर्तीवर अमरावती महापालिकेद्वारे स्टार बसेस चालविल्या जातील. हल्ली शहर बसेस खासगी कंत्राटदारांमार्फत चालविल्या जातात. मात्र, केंद्र शासनाने अमरावतीला ६४ स्टार बसेस देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्टार बसेस खरेदीच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या असून टाटा कंपनीला बसेस पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. केंद्र शासनाने बसेसच्या खरेदीसाठी नवीन बँक खाते उघडण्याचे सुचविले आहे. त्यानुसार महापालिकेने बँक खाती उघडण्याची कार्यवाहीदेखील केली आहे. टाटा मोटर्स कंपनीने एका स्टार बससाठी २४ लाख, ५० हजार, ४८८ रुपये इतकी रक्कम ठरविली आहे. केंद्र शासनाने २८ कोटींचे अनुदान दिले असून २० कोटी रुपये बस खरेदीसाठी तर आठ कोटी रुपये बसशेड, डेपो, सॉफ्टवेअरसाठी खर्च केले जाणार आहे. अमरावती-बडनेरा या प्रमुख मार्गावर सर्वाधिक स्टार बसेस चालविण्यासाठी पार पडलेल्या बैठकीत एकमत झाले आहे. लवकरच अंमलबजावणी होईल.

Web Title: Star bus connects new villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.