वलगाव महामार्गावर २३ ठिकाणी गतिरोधके

By Admin | Updated: October 8, 2015 00:11 IST2015-10-08T00:11:03+5:302015-10-08T00:11:03+5:30

गाडगे नगर ते बायपास (रिंग रोड) पर्यंत २३ ठिकाणी लहान-मोठे व रॅबलर ट्रीप्स गतिरोधक सार्वजनिक बांधकाम विभागाने लावले आहे.

Standing at 23 places on the Valgaon highway | वलगाव महामार्गावर २३ ठिकाणी गतिरोधके

वलगाव महामार्गावर २३ ठिकाणी गतिरोधके

मणक्यांच्या आजारात वाढ : अमरावतीकर म्हणतात, स्पिड ब्रेकर नको रे बाबा..
संदीप मानकर अमरावती
गाडगे नगर ते बायपास (रिंग रोड) पर्यंत २३ ठिकाणी लहान-मोठे व रॅबलर ट्रीप्स गतिरोधक सार्वजनिक बांधकाम विभागाने लावले आहे. अमरावती-वलगाव या राज्य महामाार्गवर एवढ्या मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेल्या गतिरोधकामुळे अमरावतीकर हैराण झाले आहेत. गतीरोधक नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
अमरावती ते वलगाव रस्त्यावर बायपास रस्ता (रिंगरोड) पासून गाडगेनगरपर्यंत हा पाच ते सहा कि.मी. रस्ता आहे. एका रॅपलर ट्रीप्स स्पिडब्रेकरवर सहा छोटे ब्रेकर असतात. २३ ठिकाणच्या स्पिडब्रेकरची संख्या ती १३८ होते. त्यामुळ परतवाडा-दर्यापूर व अमरावती येथील नागरिकांना येथून ये जा करतांना आपली दुचाकी व इतर वाहन चालवितांना या स्पिडब्रेकरचा सामना करावा लागतो. त्यामुळे ४० ते ६० वर्ष वयोगटातील नागरिकांना स्पॉंडिलीसीस (मणक्यांचा) व कमरेच्या आजाराने त्रस्त झाले आहे.
नागरिकांना वाहन नियमान चालवावी तरुणांनी चौकात भरधाव वाहने चालवू नये वाहनांचा वेग नियंत्रण राहावा हा या स्पिडब्रेकर टाकण्यामागचा उद्देश होता. गेल्या दोन वर्षात या रस्त्यांवर अपघाताच्या प्रमाणात जरी घट झाली असली तर नागरिक त्रस्त झालेले दिसून येत आहेत. त्यांच्यावर स्पिड ब्रेकर नको रे बाबा हि म्हणण्याची वेळ आली आहे.

Web Title: Standing at 23 places on the Valgaon highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.