मुद्रांक विक्रेते, दस्तऐवज लेखक संपावर
By Admin | Updated: July 27, 2016 00:15 IST2016-07-27T00:15:49+5:302016-07-27T00:15:49+5:30
तिवसा तहसील कार्यालयातील मुद्रांक विक्रेते व दस्तऐवज लेखकांनी २५ जुलैपासून कामबंद आंदोलन केले.

मुद्रांक विक्रेते, दस्तऐवज लेखक संपावर
शासनाविरुद्ध घोषणाबाजी : तहसीलदारांना निवेदन
तिवसा : तिवसा तहसील कार्यालयातील मुद्रांक विक्रेते व दस्तऐवज लेखकांनी २५ जुलैपासून कामबंद आंदोलन केले. आपल्या विविध मागण्यांसंदर्भात तहसीलदार राम लंके यांना निवेदन देण्यात आले. यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थींसह नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला असून विविध दाखल्यांचे कामे रखडले आहे.
खरेदी, विक्रीकरिता आॅनलाईन मुद्रांक बंद करण्यात यावे, मुद्रांक विक्रेत्यांना ५०० रुपयांवरील मुद्रांक विक्रीकरिता उपलबध करून द्यावे, मुद्रांक विक्रेता व दस्तऐवज लेखक यांचा इतर परवान्यासारखा वारसांच्या नावे मिळण्यात यावा, मुद्रांक पूरवठ्याची विक्री करण्याकरिता पुरवठा न मिळाल्यास आम्हाला शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे. या मागण्यांसाठी मुद्रांक विक्रेते व दस्तऐवत लेखक संपावर गेले असून आपल्या मागण्यांसाठी तहसीलदार राम लंके यांना निवेदन देऊन शासनाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. या संपामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना पहिल्याच दिवशी रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे. विविध दाखल्यांची कामे रखडल्याने आल्या पावली नागरिकांना परत जावे लागत आहे. यावेळी या संपात वि.डी.खोब्रागडे, डि.जी. निकाळजे, के.बी.पणपालीया, पी.आर.देशमुख, रा.दा.खोब्रागडे, के.के.पणपालीया, निलेश अंबुलकर, सूरज खोब्रागडे, शैलेश रामटेके, अश्विन तवर, अरुण पाटीलसह आदींनी संप पुकारला आहे. (शहर प्रतिनिधी)