एसटी कामगार संघटनेचे धरणे

By Admin | Updated: October 15, 2015 00:18 IST2015-10-15T00:18:36+5:302015-10-15T00:18:36+5:30

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी विविध मागण्यांची विभाग नियंत्रकांनी दखल न घेतल्याच्या निषेधार्थ प्रादेशिक राज्य महामार्ग कार्यालयासमोर धरणे दिले.

Stake of ST Workers Association | एसटी कामगार संघटनेचे धरणे

एसटी कामगार संघटनेचे धरणे

दुर्लक्ष : विभाग नियंत्रकांचा निषेध
अमरावती : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी विविध मागण्यांची विभाग नियंत्रकांनी दखल न घेतल्याच्या निषेधार्थ प्रादेशिक राज्य महामार्ग कार्यालयासमोर धरणे दिले.
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना कामगार संघटनेने यापूर्वीच ृपत्रव्यवहार करुन प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याची विनंती केली होती. या संदर्भात बैठक लावण्याचे आदेश महामंडळाच्या एमडींनी अमरावती विभाग नियंत्रक के.एम. महाजन यांनी दिले असता त्यांनी त्याची दखल घेतली नाही. या आदेशाला केराची टोपली दाखविली गेल्याचा एसटी कामगार संघटनेचा आरोप आहे. विभाग नियंत्रकांच्या विरोधात विविध मागण्या घेऊन विभागीय कार्यालयासमोर दुपारी ११ वाजता त्यामुळेच धरणे आंदोलन छेडण्यात आले.
सर्व समावेशक कॅशलेस योजना लागू करा, कामगार कराराच्या तरतुदीनुसार ३६५ दिवस भरल्यानंतर वार्षिक वेतनवाढ लागू करा, मान्य केल्यानुसार करार, कायदे, परिपत्रकांचा भंग करुन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, नियमबाह्य, शिक्षा रद्द करा, कामगार कराराच्या तरतुदीनुसार निवड श्रेणी, श्रेणीकरण देतांना कनिष्ठ एकत्रित वेतन श्रेणीवरील ५ वर्षाचा कालावधी ग्राह्य धरा, नवीन बस बांधणीसाठी वाढीव श्रमिक तास द्या, चालक-वाहकांची नियमबाह्य कामवाढ रद्द करण्याच्या प्रमुख मागण्यांसदंर्भात महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करुन लक्ष वेधले.
आंदोलनात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अमरावती विभाग अध्यक्ष डी.आर. शर्मा, सचिव योगेश ठाकरे, प्रादेशिक सचिव अभय बिहुरे, विलास पाटील, शरद मालविय, उदय पवार, धनंजय दिवाणजी, अ. हमीद, असलम खान एम.ए. देशमुख यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: Stake of ST Workers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.