रखडलेले लसीकरण घेणार वेग, २७ हजार ९०० लसी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 05:00 IST2021-05-06T05:00:00+5:302021-05-06T05:00:54+5:30

जिल्ह्यातील लसीकरण, तसेच शासकीय व खासगी रुग्णालयातील स्थिती व आवश्यक उपाययोजनांबाबत जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. सीईओ अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक  श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्यासह खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी व डॉक्टर यावेळी उपस्थित होते.

Stagnant vaccinations will be taken soon, 27 thousand 900 vaccines received | रखडलेले लसीकरण घेणार वेग, २७ हजार ९०० लसी प्राप्त

रखडलेले लसीकरण घेणार वेग, २७ हजार ९०० लसी प्राप्त

ठळक मुद्देपहिल्या, दुसऱ्या डोजसाठी केंद्रांवर स्वतंत्र नियोजन करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन मिळून २७,९०० डोज प्राप्त झाले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाईन नोंदणी केलेल्या तरुणांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण व पूर्वी लस घेतलेल्या ज्येष्ठांना दुसरी मात्रा असे नियोजनपूर्वक लसीकरण स्वतंत्र केंद्रांवर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी दिले.
जिल्ह्यातील लसीकरण, तसेच शासकीय व खासगी रुग्णालयातील स्थिती व आवश्यक उपाययोजनांबाबत जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. सीईओ अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक  श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्यासह खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी व डॉक्टर यावेळी उपस्थित होते. यापूर्वी कोविशिल्ड  घेणाऱ्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना १५,९०० लसींची दुसरी मात्रा प्राप्त झाली.  त्यामुळे या लसीचा दुसरा डोज पूर्वीच्याच शासकीय लसीकरण केंद्रावर उपलब्ध असेल. उर्वरित लसी १८ ते ४५ वयोगटासाठी राहील, असे  डीएचओ दिलीप रणमले यांनी सांगितले.  

तरुणाईच्या लसीकरणासाठी १५ केंद्रे
 महापालिका क्षेत्रात सबनीस प्लॉट येथील पालिका रुग्णालय, बिच्छु टेकडी येथील पालिका रुग्णालय, विलासनगर येथील पालिका रुग्णालय ग्रामीण भागात यावली शहीद रुग्णालय, भातकुली ग्रामीण रुग्णालय, शिरजगाव बंड (चांदूर बाजार) आरोग्य उपकेंद्र, सातरगाव (नांदगाव खंडेश्वर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, दर्यापूर, तिवसा, मोर्शी, अंजनगाव सुर्जी व वरूडमधील दोन लसीकरण केंद्रे आहेत. 

 

Web Title: Stagnant vaccinations will be taken soon, 27 thousand 900 vaccines received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.