पाणीपुरवठ्यात स्थैर्य, आठवड्यात घटले ५८ टँकर
By Admin | Updated: July 12, 2015 00:25 IST2015-07-12T00:25:25+5:302015-07-12T00:25:25+5:30
पावसात दोन आठवड्यांपासून जरी खंड असला तरी १८ ते २४ जुलै दरम्यान विभागात दमदार पावसाने अपेक्षित सरासरी ओलांडली होती.

पाणीपुरवठ्यात स्थैर्य, आठवड्यात घटले ५८ टँकर
अमरावती विभाग : सद्यस्थितीत ५१ टँकरने पाणीपुरवठा
इंदल चव्हाण अमरावती
पावसात दोन आठवड्यांपासून जरी खंड असला तरी १८ ते २४ जुलै दरम्यान विभागात दमदार पावसाने अपेक्षित सरासरी ओलांडली होती. यामुळे अमरावती विभागातील पाणीटंचाईला अंशत: दिलासा मिळाला आहे. २९ जून रोजी विभागात १०८ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. सद्यस्थितीत ५१ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात एका आठवड्यात ४२ टँकर कमी झाले आहेत.
अमरावती विभागात सध्या ५१ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ९, अकोला २, यवतमाळ १, वाशीम १७, बुलडाणा जिल्ह्यात २२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्हानिहाय टँकरची संख्या लक्षात घेता अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात हत्तीघाट, खडीमल, मोथाखेडा, तरूबांदा, आवागड येथे प्रत्येकी एक व घुईखेड येथे चार टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
अकोला जिल्ह्यात मंगरुळ व पुनोती येथे प्रत्येकी एक, यवतमाळ जिल्ह्यात पुनोती येथे एक, वाशिम जिल्ह्यात करंजी (गरड), राजुरा, देवगणा खांब, पांगरी कुटे येथे प्रत्येकी एक व मालेगाव येथे ६, बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर (ग्रामीण) येथे ६, गाडेगाव २, वाकोडी २ तसेच हनवतखेडा, जांब, पिंपळखेड, हिवरा साबळे, धोत्रा नंदई, मातमळ, पिंपळखुटा, किनगाव जहू, कवठ व अंत्री खेडेकर येथे प्रत्येकी एक व सोनोसी येथे २ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विभागात १६ तालुक्यांत ३५ गावांमध्ये १२ शासकीय व ३९ खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
जल प्रकल्पांत सरासरी
३२.७८ टक्के जलसाठा
अमरावती विभागात नऊ मुख्य प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची प्रकल्पीय उपयुक्त ११४.६३ द.ल.घ.मी. पातळी अपेक्षित असताना सद्यस्थितीत ४९.६४ द.ल.घ.मी. जलसाठा शिल्लक आहे. २३ मध्यम प्रकल्पांत ३६.६६ टक्के तर ४२० लघु प्रकल्पांत जलसाठ्याची सरासरी जलपातळी १९.९५ टक्के आहे.
एक मुख्य, चार मध्यम प्रकल्प तहानलेले
अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा या मुख्य प्रकल्पात ८.६४ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांत अकोला जिल्ह्यातील उमा प्रकल्प कोरडा पडण्याच्या स्थितीत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील तोरणा ३.४ टक्के व कोराडीमध्ये अवघा ६.२८ टक्के जलसाठा असल्याने हे प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.