शेजाऱ्याच्या छातीत चाकू मारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST2021-07-22T04:09:40+5:302021-07-22T04:09:40+5:30
---------------- युवतीला फूस लावून पळविले बेनोडा (शहीद) : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून १६ वर्षीय युवतीला फूस लावून ...

शेजाऱ्याच्या छातीत चाकू मारला
----------------
युवतीला फूस लावून पळविले
बेनोडा (शहीद) : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून १६ वर्षीय युवतीला फूस लावून पळवून नेण्यात आल्याची तक्रार बेनोडा पोलीस ठाण्यात २० जुलै रोजी दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
------------
कोदोरीतून पळविले पाच हजार रुपये
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील कोदोरी हरक येथे प्रवीण शेषराव मेश्राम यांच्या घराच्या स्वयंपाकखोलीतून १९ जुलैच्या रात्री तीन इसमांनी बाहेर पडून पलायन केले. त्यांचे वडील रात्री उठले असता, ही बाब उघड झाली. चोरट्यांनी त्यांचे दारही लावले होते. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-------------
५० हजारांसाठी विवाहितेचा छळ
मोर्शी : माहेरहून ५० हजार रुपये घेऊन ये, असे म्हणत पती मो. अकील मो. इशाक तसेच मो. जमीर मो. इशाक, मो. सलीम मो. इशाक, मो. शोएब मो. इशाक व एक महिला (रा. कसबेगव्हाण, अंजनगाव सुर्जी) यांनी घराबाहेर काढल्याची तक्रार २४ वर्षीय विवाहितेने मोर्शी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला.
---------
कठोरा येथे ५० हजारांसाठी विवाहितेचा छळ
परतवाडा : माहेरहून ५० हजार रुपये घेऊन ये, असे म्हणत सचिन धनराज काळबांडे, धनराज रामरावजी काळबांडे, परिमल धनराज काळबांडे व तीन महिला (रा. कठोरा बु., अमरावती) यांनी घराबाहेर काढल्याची तक्रार २३ वर्षीय विवाहितेने परतवाडा पोलीस ठाण्यात दिली. चारित्र्यावर संशय घेऊन छळ करण्यात येत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------