एसटीच्या टोलमुक्तीची घोषणा हवेतच

By Admin | Updated: August 19, 2014 23:26 IST2014-08-19T23:26:34+5:302014-08-19T23:26:34+5:30

टोलच्या माध्यमातून कोट्यावधी रूपये सरकारच्या घोषणा हवेतच विरली आहे. मागील जुलै महिन्यात राज्य सरकारने विधानसभेत एसटीला टोलमुक्त करण्याची घोषणा केली होती.

ST toll announcement must be announced | एसटीच्या टोलमुक्तीची घोषणा हवेतच

एसटीच्या टोलमुक्तीची घोषणा हवेतच

अमरावती : टोलच्या माध्यमातून कोट्यावधी रूपये सरकारच्या घोषणा हवेतच विरली आहे. मागील जुलै महिन्यात राज्य सरकारने विधानसभेत एसटीला टोलमुक्त करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जुलै महिन्यापासून एसटी टोल भरणे बंद करेल असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र एसटीला टोलपासून सुटका मिळालेलीच नाही. राज्यातील विविध टोल नाक्यावर एसटी आजही टोल भरतेच आहे त्यामुळे एसटीच्या टोलमुक्तीची घोषणा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
एसटीला टोलमधून वगळण्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली होती. जुलै महिन्यात घोषणा प्रत्यक्षात येणार असल्याचे बोलले जात होते परंतु प्रत्यक्षात आॅगस्ट महिना उजाडला तरीही एसटीला टोल भरणे चुकलेले नाही.
राज्यातील ४४ बंद केलेल्या टोल नाक्याचेच पत्र महामंडळाला प्राप्त झाले आहे. त्याउपर टोलमुक्तीच्या घोषणेबाबत काहीही अधिकृत माहिती सरकारकडून मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. टोल नाका चालकांशीही संपर्क केला असता एसटीला टोलमधून वगळण्याबाबत अधिकृत काहीच माहिती नसल्याचे सांगण्यात येते. यामुळे राज्य शासनाने विधानसभेत टोलमुक्तीच्या धोरणाबाबत निर्णय घेण्याचे सुतोवाच केले असली तरी प्रत्यक्षात शासन निर्णयाची अंमलबजावणी वेळीच होत नसल्याने याचा फायदा कुठल्याही शासकीय यंत्रणेला असो की सामाजिक नागरिकांना होत नाही. परिणामी घोषणा करुन त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

Web Title: ST toll announcement must be announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.