एसटी संप १०० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 05:00 IST2022-02-20T05:00:00+5:302022-02-20T05:00:57+5:30

राज्य शासनाच्या वेतनवाढीचा प्रस्ताव नाकारत एसटी कर्मचारी संपावर आहेत, तर संपात सहभागी होणाऱ्या नियमित कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासनाने निलंबन, बडतर्फ, प्रशासकीय बदली तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांविरोधात सेवासमाप्ती अशा कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत ४०६ निलंबित, ४०६ बडतर्फ, ११६  कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या.  सहा रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली.  

ST strike | एसटी संप १०० पार

एसटी संप १०० पार

जितेंद्र दखने
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एसटी सेवा शासनात विलीन करणाच्या मागणीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी राज्यभरातील आगारांमध्ये अघोषित संपावर ठाम आहेत. अमरावती विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचा संपाला आता ११२  दिवस झाले आहेत.  संपावर अद्यापही तोडगा निघाला नसल्याने विविध एसटी आगारांच्या प्रवेशद्वारासमोर संपकऱ्यांनी ठाण मांडले आहे.
राज्य शासनाच्या वेतनवाढीचा प्रस्ताव नाकारत एसटी कर्मचारी संपावर आहेत, तर संपात सहभागी होणाऱ्या नियमित कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासनाने निलंबन, बडतर्फ, प्रशासकीय बदली तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांविरोधात सेवासमाप्ती अशा कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत ४०६ निलंबित, ४०६ बडतर्फ, ११६  कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या.  सहा रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली.  एसटी प्रशासनाने संपकरी २०० कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र निश्चित केले आहे. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होणे पसंत केले आहे. दिवसागणिक कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून एसटीच्या १४६ फेऱ्या होत आहेत. आजघडीला ५५ चालक, ४५ वाहक कामावर परतले आहेत.

५० बसच्या फेऱ्या
कंत्राटी तसेच नियमित कर्मचारी कामावर परतत असल्याने प्रवासी वाहतूक सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अमरावती विभागातील आगारात अंशतः सुरू झाली आहेत. सद्यस्थितीत ५० बसद्वारे फेऱ्या सुरू झाल्या आहेत.  अमरावती ५२, बडनेरा ०८ , परतवाडा ०६ , वरूड २४, चांदूर रेल्वे ०४ , दर्यापूर १६, मोर्शी २८, चांदूर बाजार ०८ याप्रमाणे आगारानिहाय फेऱ्या सुरू आहेत.

एसटी कर्मचारी लोकशाही मार्गाने शांततेने दुखवट्यात सहभागी झाले आहेत. राज्य शासनाला विलिनीकरणाचा प्रस्ताव न्यायालयात सादर करण्यात आला आहे. यावर मंगळवारी न्यायालयात सुनावणी होणार असून त्यानंतर दुखवट्याची पुढील दिशा ठरवली जाणार आहे  
- संजय मालवीय
एसटी कर्मचारी

 

Web Title: ST strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.