एसटीची सुरक्षा वाऱ्यावर
By Admin | Updated: August 18, 2014 23:15 IST2014-08-18T23:15:42+5:302014-08-18T23:15:42+5:30
पुण्याच्या एसटी बसस्थानकातून माने नामक माथेफिरुने बस नेऊन पुण्यातील अनेकांना चिरडले होते. या घटनेचा धसका घेत राज्यातील सर्व बसस्थानकांत एक्झिट गेट लावून त्या बाजूलाच सुरक्षा रक्षकाचा

एसटीची सुरक्षा वाऱ्यावर
राजेश जवंजाळ - अमरावती
पुण्याच्या एसटी बसस्थानकातून माने नामक माथेफिरुने बस नेऊन पुण्यातील अनेकांना चिरडले होते. या घटनेचा धसका घेत राज्यातील सर्व बसस्थानकांत एक्झिट गेट लावून त्या बाजूलाच सुरक्षा रक्षकाचा कक्षही उभारण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार येथील मध्यवर्ती बसस्थानकातही एक्झिट गेट व सुरक्षा कक्षाची उभारणी करण्यात आली. परंतु सध्या हे गेट व कक्ष कचऱ्यात पडून आहे. याकडे एसटी महामंडळाचे दुर्लक्ष असून पुणे शहराप्रमाणे अमरावतीत एखादी अप्रिय घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
एसटी बसस्थानकातून कोणतीही बस नोंदणीशिवाय बाहेर जाता कामा नये, असा एसटीचा नियम आहे. त्यासाठीच पुणेच्या घटनेनंतर येथील मध्यवर्ती बसस्थानकात बाहेर निघण्याच्या मार्गावर रेल्वे गेटप्रमाणे एक खांब लावण्यात आला. त्याला बंद-सुरु करण्यासाठी कर्मचाऱ्यांकरिता लोखंडी पत्र्याचा कक्ष तयार करण्यात आला. यावर एसटी महामंडळाने खर्च केला. मात्र या दोघांचीही स्थिती दयनीय आहे. बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसची नोंद करण्यासाठी सुरक्षा रक्षक नियुक्त केला. परंतु नागपूर मार्गे जाणाऱ्या एसटींचीच नोंद केली जाते.