चालकाविनाच धावली एसटी!

By Admin | Updated: June 18, 2014 23:53 IST2014-06-18T23:53:07+5:302014-06-18T23:53:07+5:30

स्थानिक बसस्थानकावर १३ जून रोजी दुपारी १२ वाजता वरूडहून सावंगीला जाण्याकरिता थांबलेली बस काही वेळाने चालकाविनाच धावू लागली. या घटनेमुळे एसटीमधील प्रवासी भांबावून गेले.

ST run without a driver! | चालकाविनाच धावली एसटी!

चालकाविनाच धावली एसटी!

वरूड स्थानकातील प्रकार : चालकांच्या समयसुचकतेमुळे टळला अनर्थ
वरुड : स्थानिक बसस्थानकावर १३ जून रोजी दुपारी १२ वाजता वरूडहून सावंगीला जाण्याकरिता थांबलेली बस काही वेळाने चालकाविनाच धावू लागली. या घटनेमुळे एसटीमधील प्रवासी भांबावून गेले. काही काळ बसस्थानकावर खळबळ उडाली. काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या घेतला. शेवटी मागे-मागे जाणारी ही एसटी आगाराच्या कंपाऊंडमधील पथदीव्याच्या खांबाला जाऊन धडकली आणि थांबली. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.
वरूडहून सावंगीला निघालेली ही एसटी चालकाने हॅन्डब्रेक लाऊन बंद अवस्थेत उभी केली होती. प्रवासी बसले होते. काही वेळाने आपोआपच बस मागे-मागे चालू लागली. गाडीत चालक नसल्याचे पाहून प्रवाशांमध्ये खळबळ उडाली.
चालत्या गाडीतून काही प्रवाशांनी एका पाठोपाठ एक उड्या घेतल्या. बसस्थानकामध्ये उपस्थित काही चालकांना हा प्रकार आढळून येताच त्यांनी गाडीत चढून बस थांबविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत गाडी मागे सरकत जाऊन कम्पाऊंडमध्ये असलेल्या विद्युत दिव्याच्या खांबावर आदळल्याने संभाव्य अनर्थ टळला. चालती बस विद्युत खांबाला अडकली नसती तर सरळ नदीत जाऊन मोठा अपघात घडला असता किंवा प्रवाशांना अपघात होऊन प्राणहानी झाली असती.
मात्र, काही चालकांच्या समयसुचकतेमुळे संभाव अनर्थ टळला. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. बसस्थानक परिसरात उपस्थित इतर चालकांनी प्रसंगावधान दाखविले नसते तर मोठा अपघात घडला असता, अशी चर्चा प्रवाशांमध्ये होती. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: ST run without a driver!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.