एसटीचे आरक्षण नावालाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:36 IST2017-10-30T23:35:35+5:302017-10-30T23:36:16+5:30
बसमध्ये जागा मिळण्याकरिता बाहेरूनच दुपट्टा, रुमाल व बॅग टाकून आरक्षित केलेल्या जागेवर बसण्यासाठी प्रवाशांची आपापसात तू-तू, मै-मै होते. यात वाहक मध्यस्थी करीत नसल्याने प्रकरण हातापाईवर जात असल्याने वाहकांची डोकेदुखी वाढली आहे.

एसटीचे आरक्षण नावालाच!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बसमध्ये जागा मिळण्याकरिता बाहेरूनच दुपट्टा, रुमाल व बॅग टाकून आरक्षित केलेल्या जागेवर बसण्यासाठी प्रवाशांची आपापसात तू-तू, मै-मै होते. यात वाहक मध्यस्थी करीत नसल्याने प्रकरण हातापाईवर जात असल्याने वाहकांची डोकेदुखी वाढली आहे.
नागपूरहून अकोलाकडे जाणाºया प्रत्येक बसचा थांबा अमरावती बसस्थानकात आहे. प्रत्येक बसची येण्या-जाण्याची नोंद येथील बसस्थानकात चालकास करावी लागते. असे असताना अमरावती बसस्थानकात विचित्र प्रकार घडताना दिसून येत आहेत.
दुपट्टा ठेवून आसन आरक्षित केलेल्या प्रवाशाने उठ म्हटल्यास वाद निर्माण होत असल्याचे चित्र आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बसमध्ये गर्दी वाढली आहे. एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना अर्धे तिकीट, ४० टक्के किंवा त्याच्या पुढे अपंग असलेल्यांना ‘वन फोर्थ’ अशा सवलतीच्या योजना सोबत ज्येष्ठ नागरिक, अपंग नागरिक, माजी सैनिक, सैनिक, पत्रकार, महिला अशांना एसटीतील काही आसने आरक्षित ठेवलेली असतात.
काही दिवसांपासून सणासुदीच्या दिवसांत विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाºयांनी चार दिवस संप पुकारला. त्यामुळे प्रवाशांची कोंडी झाली होती. चार दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एसटी सुरू झाली. मात्र आता जागा आरक्षणाच्या मुद्यावर प्रवाशांमध्ये जुंपत असल्याने वाहकांची कोंडी होऊ लागली आहे.
वाहकांची मध्यस्थी महत्त्वाची
प्रत्येक बसमध्ये ठरल्याप्रमाणे आसन आरक्षित असताना अशा आसनावर सदर प्रवासी आल्याशिवाय कुणाला बसू देऊ नये किंवा वाहकांनी प्रत्येक स्टेशनवर मुनादी देण्याची तरतूद असावी, अशा सूचना द्यायला हव्यात. परंतु किरकोळ मुद्यावर वाहकांनी प्रवाशांसोबत वाद करू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी सांगितले.