एसटीची पोलिसांच्या सीआर व्हॅनला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:07 IST2017-10-31T23:07:31+5:302017-10-31T23:07:56+5:30
भरधाव एसटीने पोलिसांच्या सीआर मोबाईल व्हॅनला धडक दिल्याने पोलीस किरकोळ जखमी झाला.

एसटीची पोलिसांच्या सीआर व्हॅनला धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भरधाव एसटीने पोलिसांच्या सीआर मोबाईल व्हॅनला धडक दिल्याने पोलीस किरकोळ जखमी झाला. ही घटना मंगळवारी सकाळी पंचवटी चौकात घडली. गाडगेनगर पोलिसांनी एसटी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
गाडगेनगर पोलीस ठाण्यातील सीआर व्हॅन क्रमांक एमएच २७ एए ४८० पंचवटी चौकात गस्तीवर होती. दरम्यान सकाळी ८.०५ वाजताच्या सुमारास भरधाव अमरावती-नागपूर एसटी क्रमांक एमएच एमएच ४० वाय ५९५८ ने समोरासमोर सीआर व्हॅनला धडक दिली. यात सिआर व्हॅनमधील एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. या अपघातात परस्पंरविरोधी तक्रारी नोंदविण्यात आली आहे. एसटी महामंडळ चालक अशोक पाडुंरग दळवी (अमरावती बसस्थानक) व पोलीस नाईक अरुण भीमराव अंबारे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर ठाण्यात भादंविच्या कलम २७९ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.