एसटी बसची समोरासमोर धडक
By Admin | Updated: September 18, 2015 00:09 IST2015-09-18T00:09:57+5:302015-09-18T00:09:57+5:30
नजीकच्या सुरळी येथील नदीच्या पुलाजवळ वळण रस्त्यावर टेम्पो-बस एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एक बस झाडावर आदळी. मात्र कुठलीही प्राणहानी नाही.

एसटी बसची समोरासमोर धडक
टेम्पोला वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात : सुदैवाने जखमी किंवा प्राणहानी नाही
वरुड : नजीकच्या सुरळी येथील नदीच्या पुलाजवळ वळण रस्त्यावर टेम्पो-बस एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एक बस झाडावर आदळी. मात्र कुठलीही प्राणहानी नाही.
नागपूरकडे जाणारी बस व समोरून वरुडकडे जाणाऱ्या बसला कट मारुन पुढे जाणाऱ्या पीकअप टेम्पोला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन्ही बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन्ही बस एकमेकाला टकरावून अनियंत्रित झाल्या. वरुडकडे येणारी बस झाडावर आदळली. यामध्ये एसटीचे नुकसान झाले. मात्र प्राणहाणी किंवा कुणीही जखमी झाले नाही. ही घटना गुरुवारी सकाळी ११.३० वाजतादरम्यान घडली.
एस.टी.बस क्र. एम.एच.४० एन ९१५६ ही बस वरुडहून नागपूरला जात होती. समोरुन येणारी बस क्र. एम.एच.४०-८४४६ नागपूरहून वरुडकडे येत होती. सुरळीनजीक नदीवरील पुलावरुन गाडी वळण रस्त्यावर येताच चालकाचे नियंत्रण सुटले. एका टेम्पोने कट मारल्याने दोन्ही चालकांचे नियंत्रण सुटले आणि एकमेकांना वाचिवण्याच्या प्रयत्नात समोरासमोर बसची धडक होऊन वरुडकडे येणारी बस रस्त्यावरील एका झाडावर आदळली. सुदैवाने प्राणहाणी नाही. मात्र बसचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून दर्शनी भाग नादुरुस्त झाला आहे. या बसमध्ये विद्यार्थी होते. यातील अनेकांना किरकोळ मार लागल्याचे सांगण्यात येते. मात्र कुणालाही दवाखान्यात आणण्यात आले नाही. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. वृत्तलिहिस्तोवर कुणावरही कारवाई झाली नव्हती. (तालुका प्रतिनिधी)