श्री एकवीरा देवी प्रकटदिन महोत्सव आज

By Admin | Updated: September 3, 2016 00:12 IST2016-09-03T00:12:38+5:302016-09-03T00:12:38+5:30

अमरावतीचे आराध्य दैवत असलेल्या अंबा-एकवीरा देवी संस्थानमध्ये वर्षातून अनेकदा उत्सवांची रेलचेल असते.

Sri Ekvira Devi Weekday Festival today | श्री एकवीरा देवी प्रकटदिन महोत्सव आज

श्री एकवीरा देवी प्रकटदिन महोत्सव आज

धार्मिक कार्यक्रम : मूर्तीची खोळ पडण्याची वर्षपूर्ती 
अमरावती : अमरावतीचे आराध्य दैवत असलेल्या अंबा-एकवीरा देवी संस्थानमध्ये वर्षातून अनेकदा उत्सवांची रेलचेल असते. येथील एकवीरा देवीच्या मूर्तिची खोळ पडण्याच्या ऐतिहासिक व अदभूत घटनेच्या वर्षपूर्तीनिमित्त श्री एकवीरा देवी संस्थानमध्ये उद्या शनिवारी एकवीरा आईच्या मूळ रूपाचा प्रकटदिन उत्साहात साजरा केला जाणार आहे.
यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यामध्ये पहाटे देवीला अभिषेक व षोडषोपचारे पूजा केली जाईल. संध्याकाळी या निमित्ताने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या पर्वणीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री एकवीरा देवी संस्थानचे अध्यक्ष रमेश गोडबोले, सचिव दीपक सब्जीवाले, कोषाध्यक्ष राजेंद्र टेंबे, उपाध्यक्ष चंद्रशेखर भोंदू, सहसचिव शैलेश वानखडे, सहकोषाध्यक्ष सुरेश कारंजकर आदींनी केले आहे.
एकवीरा देवी संस्थानमार्फत दरवर्षी नवरात्रौत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्याच श्रुंखलेत आता एकवीरा देवीच्या मूळ रूपाचा प्राकट्यदिनही उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे ही भक्तांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.

Web Title: Sri Ekvira Devi Weekday Festival today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.