'गुरुदेव' वाहिनीच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या साहित्याचा प्रसार

By Admin | Updated: May 16, 2016 00:06 IST2016-05-16T00:06:37+5:302016-05-16T00:06:37+5:30

अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचार विभागाच्या वतीने गुरूदेव वाहिनी काढण्याकरिता निर्धार केला असून...

The spread of the material of the nation through 'Gurudev' channel | 'गुरुदेव' वाहिनीच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या साहित्याचा प्रसार

'गुरुदेव' वाहिनीच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या साहित्याचा प्रसार

तिवसा : अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचार विभागाच्या वतीने गुरूदेव वाहिनी काढण्याकरिता निर्धार केला असून त्याकरिता समाजाच्या विविध स्तरातून वर्गणीच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जात आहे. यातून राष्ट्रसंतांचे साहित्य सर्वाधिक प्रभावीपणे समाजमनात रुजविण्यास मदत होईल, असे प्रतिपादन भद्रावती विभागाचे आ. धानोरकर यांनी गुरुकुंज भेटीत व्यक्त केले.
ते गुरुकुंजात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीवर नतमस्तक होण्याकरिता थांबले असता प्रचार विभागप्रमुख बबनराव वानखडे यांनी त्यांना या प्रकल्पाची माहिती दिली. आश्रम परिसरातील प्रत्येक विभागाची माहिती प्रदान करून गुरुदेव वाहिनी आज खऱ्या अर्थाने गरजेची असल्याबाबत त्यांनी सांगितले. त्यांच्या सोबत गुरूदेव सेवामंडळचे पदाधिकारी हजर होते. याकरिता आ. धानोरकर यांनी ५१,०००/- ची वर्गणी दिली. हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण असून राष्ट्रसंत यामुळे विचाराच्या रुपात समाजात पोहोचतील, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The spread of the material of the nation through 'Gurudev' channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.