एक प्लेट नुडल्ससोबत एक चमचा अजिनोमोटो

By Admin | Updated: May 16, 2016 00:01 IST2016-05-16T00:01:53+5:302016-05-16T00:01:53+5:30

जीभेचे चोचले पुरविण्यासाठी चटपटीत लागणारे चायनीजचे पदार्थ खाण्यासाठी तरुणार्इंची धाव मोठ्या प्रमाणात चायनीजच्या हातगाडयावर आपल्याला पाहव्यास मिळते.

A spoon ajinomoto with a plate Noodles | एक प्लेट नुडल्ससोबत एक चमचा अजिनोमोटो

एक प्लेट नुडल्ससोबत एक चमचा अजिनोमोटो

चायनीजच्या हातगाड्यांवर सर्रास वापर : जीवघेण्या आजाराची खुलेआम विक्री
संदीप मानकर अमरावती
जीभेचे चोचले पुरविण्यासाठी चटपटीत लागणारे चायनीजचे पदार्थ खाण्यासाठी तरुणार्इंची धाव मोठ्या प्रमाणात चायनीजच्या हातगाडयावर आपल्याला पाहव्यास मिळते. या ठिकाणी विविध खाद्यपदार्थांमध्ये अजिनोमोटो या स्लोअ पॉयझनचा वापर होत असून एक प्लेटसोबत एक चमचा अजिनोमोटो मोफत मिळत आहे. शनिवारी 'लोकमत'च्या प्रतिनिधींनी विविध चायनीजच्या हातगाड्यांवर भेटी दिल्या असता हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
तांदूळ व खोबराकिससारखे दिसणारे अजिनोमोटो पावडरचा वापर सर्रास होत आहे. शहराचा फेरफटका मारला असता अंबानगरीत ३० ते ४० ठिकाणी चायनीजच्या गाड्या लागतात. तरुणाई फास्ट फूड म्हणून चविष्ट चायनीजच्या खाद्यपदार्थांकडे आकर्षित होते. पण नुडल्स व मंचुरीयन विक्रेते थोडेसे पैसे कमविण्यासाठी हजारो नागरिकांचा व लहान मुलांच्या जीवाशी खेळत आहेत. गाडगेनगर हा शैक्षणिक परिसर असल्यामुळे या ठिकाणी सर्वाधिक ८ ते १० चायनीजच्या गाड्या लागतात. या ठिकाणी चविष्ट नुडल्स व मंचुरीयन सोबत चिकन चिली, चिकन लाली पोप, चिकन फ्रॉय असे नॉनवेज पदार्थही विकले जातात. हे खाण्यासाठी या ठिकांनी तरुणांईची मोठी गर्दी असते. पण हे सर्व खाद्यपदार्थ जिभेला चटपटीत लागावे , त्याची स्वादिष्ट टेस्ट येण्यासाठी अजिनोमोटो (मोनो सोडीयम ग्लुटामेट) या अनेक आजाराला आमंत्रण देणाऱ्या एक प्रकारचे विषच असलेल्या पावडरचा वापर मिठाप्रमाणे केला जातो. एका चायनीजच्या गाडीवर पाहणी केली असता पाच प्लॅट नुडल्स तयार करण्यासाठी ६ ते ८ चमचा अजिनोमोटोचा वापर केला जातो. हे विष रोज हजारो नागरिकांच्या शरीरात असा चटपटीत खाद्यांद्वारे जात आहे. यातून आतड्यांचे, पोटाचा आजार तसेच विविध प्रकारचे कर्करोग सारखे जीवघेणे घातक आजार होत असल्याचे तज्ज्ञ डॉकटरांचे मत आहे. त्यामुळे शहरात मृत्यू विकले जात असताना एफडीएचे अधिकारी गप्प का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
आपल्या कर्तव्याचे विसर पडलेल्या एफडीएच्या अधिकारी व ेविशेष म्हणजे येथील लोकप्रतिनिधीही याप्रकरणी बिनधास्त आहेत, हे उल्लेखनीय.

कॅन्सर व आतड्यांचाही आजाराची शक्यता
एका खाद्यविक्रीच्या कंपनीने अजीनोमोटोचा वापर प्रमाणापेक्षा अधिक केल्याने शासनाने त्यावर बंदी आणली. परंतु चायनीजच्या गाड्यांवर सर्रास अजिनोमोटो पावडरचा वापर केला जात आहे. हे अन्न पदार्थ सतत खाल्ल्याने कर्करोग होतो. तसेच आतड्यांचे आजार व पाटाचे ईन्फालामेंट्री बाऊल डीसीज होऊ शकतो.

शहरात ४० ते ५० ठिकाणी विक्री
अमरावतीत सवाधिक चायनीज पदार्थांची विक्री ही पंचवटी चौकात करण्यात येते. येथे ८ ते१० हातगाड्या आहेत. तर गाडगेनगर, राजकमलचौक, गांधीचौक, दस्तूरनगर व शहरात अनेक ठिकाणी चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या ४० ते ५० हातगाड्या शहरात व्यवसाय करतात. काही व्यावसायिकांची एफडीएकडे नोंदणीच नाही.

अन्न, प्रशासन विभागाने कारवाई केल्यास सत्य बाहेर
चायनीजच्या हातगाड्यांवर अन्न पदार्थात शरीराला घातक अशा अजिनोमोटोचा वापर करण्यात आहे. या ठिकाणी पदार्थ चविष्ट लागण्यासाठी अजिनोमोटोचा सर्रास वापर करण्यात येते. अन्न व औषधी प्रशासन विभागाने अन्न पदार्थांचे नमुने घेतल्यास व ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविल्यास अजिनोमोटोचा वापर होत असल्याचे सत्य बाहेर येईल. खाद्यपदार्थात अजिनोमोटोचा प्रमाणापेक्षा जास्त वापर केल्याने एका नामांकित कंपनीच्या उत्पादनावर बॅन आले होते, हे विशेष.

१०० रुपयांत मिळतो आजार
नागरिकांच्या जीविताशी रोज खेळ खेळला जात आहेत. ५० ते १०० रुपयांत कॅन्सरसारखे आजार विकला जात आहेत. नुडल्स हा लोकप्रिय पदार्थ खाण्यासाठी तरुणांईची गर्दी असते. ३० ते ५० रुपयात नुडल्स व मंचुरीयन मिळते. १०० रुपये प्लेट चिकन चिली, ८० रुपयांत चिकन लाली पॉप, राईस चिकन फ्राय आदी खाद्यपदार्थ येथे मिळतात. या सर्व पदार्थात चव येण्यासाठी अजिनोमोटो या घातक पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे हे सर्व जीवघेणे आजार कमी पैशात विकले जात आहेत.

काय आहे अजिनोमोटो ?
'मोनो सोडीयम ग्लुटामेट' असा त्याचे नाव आहे. त्याला (टेस्टींग पावडर) असेही म्हणतात. त्या पावडरचा प्रमाणापेक्षा अधिक वापर केल्यास अनेक आजार बळावतात. हे हॉटेलच्या भाज्या चवदार व स्वादिष्ट व्हाव्या यासाठी याचा वापर विविध हॉटेलसमध्ये व विशेषत: चायनीजच्या हातगाड्यांवर नुडल्स व मंचुरीयनमध्ये सर्रास वापर केला जात आहे. तसेच चिकन चिली, चिकन फ्रॉय अशा नॉन व्हेज खाद्यपदार्थातही याचा सर्रास वापर होत आहे. यामुळे नागरिक भयंकर आजाराला बळी पडत आहे.

Web Title: A spoon ajinomoto with a plate Noodles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.