महापौर श्री शरीर सौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: December 22, 2015 00:08 IST2015-12-22T00:08:03+5:302015-12-22T00:08:03+5:30
विदर्भ बॉडी बिल्डिंग असोशियनच्या नियंत्रणात महापालिका व येथील आझाद हिंद मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

महापौर श्री शरीर सौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
बक्षिसांचा वर्षाव : महापालिकेचे राज्यस्तरीय आयोजन
अमरावती : विदर्भ बॉडी बिल्डिंग असोशियनच्या नियंत्रणात महापालिका व येथील आझाद हिंद मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शरीर सौष्ठव महापौर श्री स्पर्धेला सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत राज्यभरातील शरीर सौष्ठवपटूंनी सहभाग घेतला.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात महापौर चरणजितकौर नंदा यांच्या हस्ते या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्थायी समिती सभापती विलास इंगोले, पक्षनेता बबलू शेखावत, माजी खासदार अनंत गुढे, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, उपायुक्त चंदन पाटील, गटनेता अविनाश मार्डीकर, शिक्षण सभापती अब्दुल रफीक, माजी विरोधी पक्षनेता दिंगबर डहाके, प्रशांत वानखडे, दिनेश बूब, चेतन पवार, माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल, निलिमा काळे, राजेंद्र महल्ले, राजाभाऊ मोरे, आर्चरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत देशपांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, आंतरराष्ट्रीय पंच दीपक बागुल, माजी नगरसेवक लकी नंदा आदी उपस्थित होते. यावेळी भगवान श्री हनुमान व माजी नगराध्यक्ष हरिभाऊ कलोती यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. प्रास्ताविक स्थायी समिती सभापती विलास इंगोले यांनी केले. (प्रतिनिधी)