बाबुजींच्या जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: July 3, 2016 00:11 IST2016-07-03T00:11:19+5:302016-07-03T00:11:19+5:30
लोकमत वृत्तपत्राचे समूहाचे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरवाल दर्डा उपाख्य बाबुजी...

बाबुजींच्या जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
रक्तदात्यांना प्रमाणपत्र : छत्रपती संघटनेचे सहकार्य
अमरावती : लोकमत वृत्तपत्राचे समूहाचे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरवाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त शनिवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन स्थानिक लोकमत भवनमध्ये करण्यात आले होते.
लोकमत संत गाडगेबाबा रक्तपेढी आणि कंम्पोनंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबिरात संत गाडगेबाबा रक्तपेढी व कंपोनेट सेंटर बडनेराचा पूर्ण चमू अनिल कवीमंडन, सोपान गोडबोले अमित आरोकर, कवीता मारुळकर, वैष्णवी चिखलकर, रवी कदम, आकाश लाकडे, विकास खंडार आदींनी महत्वाचे भूमिका पार पाडली.
सदर शिबिरात सहभागी झालेल्या सहभागीस गाडगेबाबा रक्तपेढीकडून प्रमाणपत्र देण्यात आला. शिबिरात आलेल्या प्रत्येक सहभागीने सामाजीकतेचे भान ठेवून रक्तदान केले. संकलन झालेले रक्त गंभीर आजाराच्या रुग्णाला किंवा अपघातात जखमी झालेल्याना रक्ताची नितांत आवश्यकता असते. रक्तदात्यांकडून मिळालेले रक्त लोकांचे जीव वाचवू शकतात. म्हणूनच रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. या प्रसंगातूनच रक्तदात्यांना समाजाचे ऋण फेडण्याची संधी उपलब्ध झाली.
सदर शिबिरात छत्रपती संघटनेचे विशेष सहकार्य लाभले. सदर शिबिरात आशिष तायोडे, वैभव वानखेडे, शिवम लाहोटे, अक्षय ढोले, अजय गीरी, वैभव काकडे, संदीप देशमुख, हेमंत महिंगे, शीला धोटे, संजय गुल्हाने, मनोज प्रधान, राजेश मालधुरे, जयंत कौलगीकर, सुचित्रा शेळके, ललिता पुराणिक, चेतन चव्हाण, शोनिल सुखदेवे, नैना कदम आदींनी रक्तदानकरून समाजाप्रती आपली बांधिलकी दाखवली.